Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शेडगाव जळीतकांडातील महिलेचा मृत्यू

Share

आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- शेडगाव येथे (दि.28 ऑगस्ट) सख्खा भाऊ व त्याच्या पत्नीने छप्पर पेटवून गोरख मारुती भदे (वय 41) याच्यासह त्याच्या पत्नीस जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. छप्पर जळाल्यानंतर दार तोडून बाहेर आलेल्या गोरख भदे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. उपचारादरम्यान गोरख भदे मयत झाले. तर त्यांच्या पत्नी सुरेखा गोरख भदे यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात भादंवी 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शरद मारुती भदे, रंजना शरद भदे यांच्यासह इतर 13 जण व अनोळखी 10 जणांवर यापूर्वीच खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 ऑगस्टला शेतातील काम करत असलेल्या, गोरख भदे यांच्या ट्रॅक्टरला लाईटची वायर अटकून तुटली. त्यावरून गोरख व भाऊ शरद यांच्यामध्ये शिवीगाळ व हाणामारी झाली. पोलीस स्टेशनला शरद मारुती भदे याच्यावर गोरख यांनी विनयभंगासह पत्नी मुलगा यांच्यावर इतर गुन्हे दाखल केले होते.

श्रीगोंदा पोलिसांनी याप्रकरणी शरद भदे, त्याची पत्नी व मुलगा यांच्यावर (दि. 27) प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. याचा राग अनावर होऊन माझी पोलिसांत तक्रार दिली म्हणत, शरद व त्याच्या कुटुंबातील इसमांनी गोरख व त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याच्या उद्देशाने, राहत्या छपराचे दार बंद करून, पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास छप्पर पेटवून दिले होते. दारात लोखंडी टामी आणि गुप्ती घेऊन, सख्ख्या भावाला मारण्याच्या उद्देशाने आरडाओरड करत शिवीगाळ केली होती. छप्पर पेटल्याने आगीचे लोळ आत पडत होते. गंभीररित्या भाजल्याने, गोरख व त्यांची पत्नी जीव वाचवण्यासाठी दार तोडून बाहेर आले. मात्र, दारात थांबलेल्या शरदने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

डोक्यात व पाठीवर गुप्तीने व टामीने वार करीत त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर, श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्नासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यादिवशी उपचारासाठी गोरख व त्याच्या पत्नीला नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. 57 टक्के भाजलेल्या गोरख भदे यांचा 12 सप्टेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पत्नी सुरेखा ह्या देखील गंभीर जखमी असल्याने उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी विरोधात भादंवी 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!