Type to search

जळगाव

शेकडो घंटागाड्या असूनही कचर्‍याची दैनाच!

Share

जळगाव | शहरात घनकचरा प्रकल्पांतर्गत शहरातील घनकचरा उचलण्याचे काम एकमुस्त ठेक्यातर्फे करण्यात येत आहे. शहरात प्रमुख चार ठिकाणी घनकचरा जमा करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार नेरी नाक्याच्या पुढील स्मशानभूमी जवळ कचरा टाकण्यासाठी नाल्याकाठी एक जागा निश्‍चित करण्यात आली आहे. मात्र या जागेवर जावून कचरा व्यवस्थित टाकला जात नसल्याची नागरिकांची ओरड वाढत आहे. आधीच पावसाळा सुरू असल्याने आणलेल्या कचर्‍याची व्यवस्था आणखीनच दयनीय होत आहे. या कचर्‍याचा प्रादुर्भाव होवू शकतो, तसेच कचरा

उपयोगाचा राहणार नाही, तरी संबधित अधिकार्‍यांनी सतर्कतेने लक्ष दिले पाहिजे, असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

दखल घेण्याची गरज

एकीकडे शहर स्वच्छ करण्यासाठी या शेकडो घंटागाड्या या संपूर्ण शहरातून कचरा गोळा करीत आहेत. शहर स्वच्छ करीत आहेत, मात्र हा कचरा थेट डेपोपर्यत न पोहोचवता डेपोशेजारीच इतरत्र अक्षरश: फेकला जात आहे. घंटागाडी वाहनधारक कचरा फेकून जात आहेत. शहरात चार ठिकाणी कचरा संकलीत केला जात आहे. मात्र हा कचरा वाहनधारकांनी किमान थेट निश्‍चित केलेल्या जागेवर तरी आणून टाकावा, अशी अपेक्षा आहे. स्मशानभूमीजवळील डेपोवर हा कचरा इतरत्र फेकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

नागरिकांच्या तक्रारी

एकीकडे केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेवर भर देत आहे, निधी देत आहे, मनपाने मोठा निधी देवून घनकचरा प्रकल्पांतर्गत कचरा उचलण्यासाठी निधी उपलब्ध केला आहे तसेच आपली शेकडो वाहने कचरा उचलण्यासाठी ठेकेदाराच्या मदतीला उपलब्ध करुन दिल्या आहेत.  ठेकेदाराचे कर्मचारी तसेच मनपाचे कर्मचारी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर कर्मचार्‍यांचा लवाजमा याकामी असतांना शहरातून उचलून आणलेला कचरा डेपोपर्यत पोहचत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

भंगारवाल्यांचा अडथळा

स्मशानभूमीजवळील डेपोच्या ठिकाणी काही भंगारवाले आपली एक-एक वस्तू वेगवेगळे करण्यासाठी येथे वाहने लावतात. त्यांचा अडथळा या घंटागाडी चालकांना होतो असे बोलले जात आहे. तरी घंटागाडी चालकांना असा कुठलाही अडथळा येवू नये. त्यांनी आपल्या वाहनातील कचरा थेट डेपोवर पोहोचावा, याकामी ठेकेदार व मनपाच्या आरोग्य विभागातील निरीक्षकांनी या ठिकाणी जावून याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. आधीच शहरात पाउस पडत आहे. या पावसामुळे कचर्‍याची अधिक घाण होते. याचा प्रादुर्भाव होवू नये याची खबरदारी घेतली पाहिजे.

नियोजनाचा अभाव

स्मशानभुमीजवळ असलेला नाल्यालगत कचरा जमा करण्याची जागा निश्‍चित केलेली आहे. असे असतांना घंटागाडीचालक हे इतरत्र कचरा टाकून जातात. हे चुकीचे असून कचर्‍याबाबत संबंधीत ठेकेदार, आरोग्य अधीक्षक, निरीक्षक यांच्याकडून नियोजनाचा अभाव असल्याचे घंटागाडी चालकांचे म्हणणे आहे. चिखल व पावसामुळे घंटागाडी थेट कचर्‍या संकलीत करण्याच्या जागेपर्यंत पोहचण्यास अडथळा येतो. तसेच एकाचवेळी अनेक घंटागाड्या कचरा टाकण्यास येतात, यामुळे वाहतुक कोंडीचाही प्रश्‍न निर्माण होतो.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!