शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

0
गणोरे (वार्ताहर) – राज्यातील इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली.राज्यात प्रथमच शिक्षण हक्क कायद्याच्या अस्तित्वानंतर चौथी व सातवीच्या परीक्षा रद्द करीत शासनाने एक वर्षाच्या विरामानंतर घेतलेली ही पहिलीच परीक्षा होती.त्यामुळे अनेकांचे लक्ष लागून होते. राज्याचा निकाल अवघा 18 टक्के लागला आहे.
पाचवीकरिता पाच लाख पंचेचाळीस हजार 881 विघार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी पाच लाख सव्वीस हजार 597 परीक्षेला प्रविष्ठ झाली होते.त्यापैकी एक लाख 12 हजार 856 विद्यार्थी पात्र ठरली आहेत.शेकडा 21.43 टक्के विद्यार्थी उत्तीर्णतेचे प्रमाण आहे.तर आठवी करिता4 लाख 3 हजार 301 अर्ज सादर केले.पैकी 3 लाख 90 हजार 855 परीक्षा दिली,12446 विद्यार्थी गैरहजर होती.52567 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.हे प्रमाण अवघे 13.45 टक्के आहे,राज्यात एकूण 9 लाख 49 हजार 182 विद्यार्थ्यांपैकी 9 लाख 17 हजार 452 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.त्यापैकी 1 लाख 65 हजार 423 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.हे प्रमाण अवघे 18.3 टक्के आहे.राज्यातील 636 विद्यार्थ्यांचे निकाल विविध कारणांनी राखीव ठेवण्यात आले आहेत.
परीक्षा परीषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या आदीवासी विद्या निकेतन प्रवेश परीक्षा,विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व उच्च प्राथमिक,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. सदरचा निकाल परिषदेच्या www.pupps.in संकेत स्थळावर घोषित करण्यात आले आहेत.संकेतस्थळावरून निकाल प्राप्त करता येईल.ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करावयाची आहे त्यांनी प्रत्येक पेपरकरिता पन्नास रुपये, तर उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतिकरिता प्रति पेपर करिता शंभर रुपये ऑनलाईन भरून प्राप्त करता येईल. विद्यार्थ्यांच्या संबंधी बदलाकरिता 31 मे पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. आवश्यक ती माहिती तीस दिवसांनंतर कळविण्यात येईल. सदरच्या माहितीचे अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. असेही डेरे यांनी सांगितले आहे.

 

LEAVE A REPLY

*