शिवसैनिकांनी सावळीविहीरमध्ये नगर मनमाड रस्ता रोखला

0

दूध व कांदे रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध

 

राहाता (वार्ताहर)- सावळीविहीर येथे नगर मनमाड रोडवर शिवसेनेच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर दूध व कांदे फेकून सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली. यावेळी रास्तारोकोमुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.

 
शिवसेना उपजिल्हाप्रमुख नाना बावके यांच्यासह शिर्डी शहर प्रमुख सचिन कोते, राहाता शहर प्रमुख गणेश सोमवंशी तसेच विजय काळे यांनी सावळीविहीर येथे शिवसेनेच्यावतीने नगर मनमाड महामार्गावर दुधाने भरलेले कॅन व कांदा ओतून आंदोलन केले. सरकारने तातडीने कर्ज मुक्तीची घोषणा दिल्या.

 

‘या भाजप सरकारचं करायच काय? खाली डोक वरती पाय’ म्हणत सरकारचा निषेध केला. यावेळी बोलताना नाना बावके म्हणाले शिवसेना शेतकर्‍यांबरोबर आहे. शेतकर्‍यांनी सुरू केलेल्या संपास शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. जोपर्यंत शेतकर्‍यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही असा इशारा बावके यांनी दिला.

 

यावेळी सचिन कोते यांचे भाषण झाली. यावेळी किरण जपे, दिनेश आरणे, संदिप विघे, राकेश आरणे, सागर जपे व शिवसैनीक तसेच शेतकरी उपस्थित होते.

 

 

 राहाता तालुक्यात शेतकरी संप या विषयावर कोठेही केसेस दाखल झाल्यास राहाता येथील अ‍ॅड. समिर करमासे मोफत केस चालविणार आहेत. अशी माहिती राहाता शहर प्रमुख गणेश सोमवंशी यांनी दिली. 

LEAVE A REPLY

*