शिवसेनेने भांडवल केल्याची दानवेंच्या पत्नीची खंत

0

पाथर्डी (प्रतिनिधी) – साहेबांचा स्वभाव सरळ मार्गी व बोलण्याची ग्रामीण भागाची ढंग आहे. शेतकर्‍यांविषयी वाईट भावना ठेवणारा माणूस अशी टीका चुकीची आहे.आयुष्यात अनेक चांगल्या वाईट प्रसंगाना आमचे कुटुंब सामोरे गेले.

 

विरोधकांचे काम समजू शकतो, पण शिवसेनेसारख्या घटक पक्षाकडून ज्या पद्धतीने भांडवल केले जाते त्याचे जास्त दुःख होते अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे यांनी व्यथा बोलून दाखवली
श्री क्षेत्र मोहटादेवीच्या महापुजेसाठी सौ. दानवे यांनी मोहटादेवी देवस्थानला भेट दिली. त्यांच्या समवेत त्यांची कन्या व शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शोभा मतकर, भोकरदन पालिकेच्या नगरसेविका आशा माळी, अलका गाडेकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, माजी अध्यक्ष मुकुंद गर्जे,महादेव दहिफळे उपस्थित होते

 
विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराला तोंड देण्यासाठी शिवसेनेकडून सहकार्य अपेक्षित होते.तुम्ही आमच्या भागात येऊन पहा साहेबांविषयी कार्यकर्त्यांचा किती आदर आहे.राजकारणासाठी असे छळण्याचे प्रकार नवीन नाहीत.साहेब खूप धीर गंभीर व खंबीर आहेत.अशा प्रकाराने विचलित होत नाहीत.या प्रकारणातूनही त्यांची प्रतिमा अधिक उजळून निघणार आहे.असे निर्मलाताई दानवे यांनी सांगतानाच, आम्ही सर्व खंबीरपणे आहोत.यामागचे हितशत्रूंचे कारस्थान लवकरच उघडे पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*