Type to search

धुळे

शिवसेनेच्या बैठकीत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर रोष

Share

धुळे । शिवसेना जिल्हाप्रमुखांवर हल्ला करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यास पोलिस प्रशासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाविरोधात शिवसेनेची बैठक झाली. त्यात शिवसैनिकांनी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर रोष व्यक्त केला. तसेच हल्लेखोरांवर योग्य ती कारवाई न झाल्यास जिल्हाभरात व्यापक जनआंदोलन करण्यात येईल, अशा निर्णयही घेण्यात आला.

शहरातील प्रबोधनकार ठाकरे संकुलातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात मंगळवारी ही बैठक झाली. बैठकीला जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आ.शरद पाटील, नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, हेमा हेमाडे, धीरज पाटील, सुशील महाजन आदी उपस्थित होते. यावेळी माजी आ.शरद पाटील म्हणाले की, शहरात चोर्‍या, लुटमार, गुंडगिरीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांचा धाक उरलेला नाही. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांवर भ्याड हल्ला झाला. यासंदर्भात पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतरही कलमे परस्पर हटविण्यात आली. पोलिस प्रशासनाकडून होणारा हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. त्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल.

हिलाल माळी म्हणाले की, सेनेचे पदाधिकारी चुकीची कामे करत नाहीत. म्हणून घाबरण्याचे देखील कारण नाही. शिवसैनिक एकत्र आले तर काय करु शकतात, हे दाखवून देण्यासाठी शिवसैनिकांनी तयार राहावे. पोलिस प्रशासन गुंडगिरीला आळा घालण्याऐवजी पाठबळ देत असल्याचा आरोपही हिलाल माळी यांनी यावेळी केला.

बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांच्याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. जिल्हाप्रमुखांवर हल्ला होऊनही वरिष्ठस्तरावर दखल घेतली जात नसल्याची नाराजी यावेळी बोलून दाखविण्यात आली. तसेच हिलाल माळी यांच्यावर हल्ला करणार्‍यांवर गुन्हे दाखल होऊन योग्य कारवाई न झाल्यास सेनेतर्फे जिल्हाभरात आंदोलन करण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!