शिवसेनेचा भाजपला जय महाराष्ट्र,पालिका निवडणूक स्वबळावर लढविणार

0

ठाणे/भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या 24 मे रोजी होणार्‍या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत अखेर शिवसेना- भाजपची युती होऊ शकली नाही.

त्यामुळे शिवसेनेने भाजपला जय महाराष्ट्र करीत स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.

5 व 6 मे रोजी राजकीय पक्षांच्यावतीने ऑॅनलाईनद्वारे अर्ज दाखल करण्याची तयारी पक्षांच्या पदाधिकारीर्‍यांनी जोमाने सुरू केली आहे.

 

प्रचाराची रूपरेषा ठरवण्यासाठी काल सायंकाळी दोन्ही पक्षांच्या कार्यालयांमध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते, नगरसेवक, पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

महापालिकेच्या सत्ता व अर्थकारणात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेल्या माजी महापौर विलास आर. पाटील यांच्या कोणार्क विकास आघाडीसोबत भाजपने हातमिळवणी केली आहे.

प्रभाग 1 आणि 6 तील 6 जागा कोणार्क विकास आघाडीला सोडण्याचा निर्णय घेऊन प्रभाग 6 मध्ये दोन जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर चर्चेच्या पहिल्या टप्प्यात शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष विलास पाटील यांच्या कोणार्क विकास आघाडीला प्रभाग 1 व 2 सोडणार असल्याचे चित्र रंगवण्यात आले.

मात्र शिवसेना दोन्ही प्रभागांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचे शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने यांनी सांगितले.

तर कोणार्क आघाडीशी युती करून दोन जागांवर भाजप निवडणूक लढवत आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली.

दरम्यान, पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेच्या युतीसाठी चर्चेची बोलणी सुरू होती.

मात्र प्रदेश पातळीवर याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्यामुळे शिवसेना स्वबळावर उमेदवार उभे करून निवडणूक लढविणार असल्याची माहिती शिवसेना आमदार रुपेश म्हात्रे, शहरप्रमुख सुभाष माने यांनी दिली.

शिवसेना मुस्लीम बहुल प्रभागांमध्ये त्या समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी उमेदवार उभे करणार असल्याचे शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*