शिवसेनेकडून शेतकऱ्यांसाठी प्रश्नावलीचे वाटप

0

जानोरी (वार्ताहर ) -शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व्हावी व शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहचाव्यात यासाठी शिवसेनेने कर्जमुक्ती फॉर्म धोरण सुरु केले आहे.मात्र शिवसेना सत्तेत असून त्यांच्या या दुटप्पी राजकारणाचा ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला.

सध्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी यासाठी शेतकर्यांनी लढा उभा केला असुन राजकीय पक्ष आपला यात कसा फायदा करून घेण्यासाठी पक्ष पुढे सरसावलेले दिसत आहेत. यात सरकारमध्ये सामील असलेला शिवसेना पक्षही मागे नाही.

शेतकर्यांना कर्जमुक्ती मिळावी यासाठी शिवसेनेच्यावतीने शेतकर्यांचे फार्म भरण्याचे मोहीम सुरू केले आहे. त्यात अनेक प्रश्न विचारलेले असुन त्या प्रश्नाचे होय अथवा नाही म्हणून उत्तर देयचे आहे.

त्यात एक प्रश्न असा आहे कि सरकार निरूपयोगी ठरल्याची चीड मनात खदखदत आहे का? म्हणुन प्रश्न शेतकर्यांना विचारण्यात येत असुन शिवसेनेला जर सरकार निरूपयोगी वाटत असेल तर ते सरकारमधून बाहेर का पडत नाही.

सरकारमध्ये सहभागी असतानाही शिवसेनेला अशी मोहीम हाती घेण्याची गरज काय? तसेच शेतकर्यांची दिशाभूल करण्यासाठी शिवसेनेने तयार केलेल्या या दुटप्पी धोरणाला जानोरीतील युवक शेतकर्यांनी शिवसेनेचे कर्जमुक्ती फार्म फाडून विरोध दर्शविला.

यावेळी माजी जि.प.सदस्य शंकरराव काठे, योगेश तिडके, हर्षल काठे, निवृत्ती विधाते, संदीप तिडके, भास्कर काठे, उत्तम काठे, बाळासाहेब खोडे, दत्तात्रय तिडके, संदिप वाघ आदी युवा शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*