शिवसेना,भाजप बैठकात कानमंत्रे! ; नेत्यांकडून पदाधिकार्‍यांना सबुरीचे सल्ले

0

नाशिक (सोमनाथ ताकवाले) : मुंबईत मनपामध्ये सत्ता स्थापना आणि महापौर निवडीवरून कोण-कोणाबरोबर जाणार, याचे धुसर चित्र शिवसेना, भाजप यांच्यासह काँगे्रस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बोलण्यातून व्यक्त होऊ लागले आहे. त्यामूळे नाशिकला शिवसेना आणि भाजपने आपल्या पदाधिकार्‍यांना थेट जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी हालचालींना गती देण्यासाठी बैठका घेण्यास सांगितले होते. सेनेने आपल्या बैठकीत राज्यात काही होवू नाशिकमध्ये जि.प.अध्यक्ष सेनेचा असेल, असे ठामपणे सांगितले आहे. तर भाजपने युती अभेद राहील, हे म्हणत जिल्हा परिषदेत युती करण्याचे संकेत दिले आहे. त्यामूळे जि.प.वर येत्या 21 मार्चला भगवा फडकणार हे स्पष्ट दिसत आहे. तर अध्यक्ष हा कोणाचा होणार हे लपून राहिलेले नाही.

निवडून आलेल्या अनेक सदस्यांपैकी भाजप आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित सदस्य हे इतर पक्षातून आलेले आहेत. तर काहींना अनपेक्षितपणे निवडणूकीत विजय मिळालेला आहे. या सदस्यांचे मन आर्थिक आणि इतर राजकीय प्रलोबभनांनी कोणत्याही पक्षाने जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर वळवू नये, यासाठी काल शिवसेनेने नवनिर्वाचीत सदस्य सत्काराचे निमित्त पुढे करून संपर्कप्रमुख सुहास सामंत यांच्या नेतृत्वात सेनापदाधिकारी यांची बैठक झाली. तर, शिवसेनेने इतरांकडे वळण्याअगोदर भाजपने सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांची आणि पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन मुंबईत होत असलेल्या घडामोडींचे कानमंत्र संबंधितांना दिले आहे. त्यामूळे या सेना-भाजप पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका एकाच दिवशी आणि एकाच निमित्ताने नाशिकमध्ये होणे आणि त्यात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आणि पंचायत समिती सभापतींच्या निवडीवर भाष्य होणे, यातून स्थानिक पदाधिकार्‍यांना योग्य ते कानमंत्र दिल्याचे सूचीत झाले आहे.

प्रदेशस्तरावर शिवसेनेला काँगे्रस, राष्ट्रवादी मुंबई महापालिकेत सत्तेसाठी मदत करण्याची हालचाल करीत असल्याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँगे्रस आणि राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्यासे म्हणत राजकीय गुगली टाकली आहे. यामूळे सर्व जिल्हा परिषदा आणि मनपाच्या अध्यक्ष आणि महापौर निवड प्रक्रियेत अडकेलेल्या काँगे्रस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि शिवसेनाच्या विद्यमान हालचालींना खिळ घालण्याचा प्रयत्न मानला जात आहे.

नाशिक जिल्हा परिषदेत शिवसेनेने आपला अध्यक्ष बनविण्यासाठी 25 या गट सदस्यासह एक एकलहरे गटातून निवडून आलेले अपक्ष उमेदवार शंकर धनवटे यांनाही गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्टपणे पदाधिकार्‍यांच्या बैठकीत म्हटले आहे. तसेच इतर पक्षांचे सदस्य फोडण्यासाठी घोडेबाजाराला ऊत येत असल्याचे जिल्हा परिषद गटांमध्ये जगजाहीर चर्चा आहे. भाजपला 15 सदस्य सांभाळावे लागणे जिकीरीचे आहेत. कारण भाजपमध्ये येऊन इतर पक्षांतील बंडखोर उमेदवारांनी विजय संपादन केलेला आहे. त्यातून कोणी फुटू नये, याची खबरदारी भाजपला घेणे गरजेचे झाल्याने कालच्या तातडीच्या बैठकीत चर्चेत तो एक महत्वाचा मुद्दा होता.

जिल्हा परिषदेत शिवसेनेला राष्ट्रवादी मदत करण्याची शक्यता गृहीत धरून तसेच सेनेच्या बैठकीत राष्ट्रवादीचे काही नवनिर्वाचित सदस्य चमकल्याने भाजपचे नेते महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, शिवसेनेला अशी अमंगल युती करू नये, अशी अपसूक सुचना दिली. तर शिवसेनेने काही करून सेनेचा अध्यक्ष जिल्हा परिषदेत बसेल, त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जातीने लक्ष घालून आहेत, असे नमूद केलेले आहे.

भाजपला मनपात सत्ता स्थापन करता येणार आहे. मात्र जिल्ह्यात हात पसरण्यासाठी जिल्हा परिषदेतील सत्तेत स्थान आवश्यक वाटत असल्याने शिवसेनेला मदत करण्याचे भाजपला वारंवार वाटत आह, या सहजपणातून भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी निकाल लागल्याच्या सांयकाळीच जिल्हा परिषदेत शिवसेनेला भाजप मदत करेल, असे सुतोवाच करून थेटपणे मदतीचा हात पुढे केला होता. पण मुंबईत ज्या काही राजकीय हालचाली त्याच दिवसांपासून चार प्रमुख पक्षात सुरु झालेल्या आहे. त्यामूळे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सत्ता स्थापना हा विषय शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना वरून येणार्‍या सूचनांशिवाय हाताळता येत नसल्याचीही वस्तुस्थिती आहे.

LEAVE A REPLY

*