शिवजयंतीनिमित्त नाशिकचे रस्ते भगवामय

0

नाशिक, ता. १५ : छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार येणारी जयंती नाशिक शहरात पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.

त्यामुळे शहर भगवामय झाले असून शिवरायांची महती गाणाऱ्या पोवाड्यांच्या रेकॉर्डस्‌मुळे ठिकठिकाणचे वातावरण भारावून जात आहे.

WhatsApp Image 2017-03-15 at 12.27.30

शहरातील अनेक ठिकाणी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

विविध चौकांमध्ये छत्रपतींच्या मूर्तीसह सुरेख देखावे साकारलेले दिसत आहेत.

अनेक दुचाकी व चारचाकी वाहनधारकांनी वाहनांना भगवा झेंडा लावल्याने शहरात सगळीकडे भगवा फडकताना दिसत आहे.

दुपारी चार वाजता जुन्या नाशकातून प्रथेप्रमाणे शिवजयंती उत्सवाची मिरवणूक सुरू होणार आहे.

त्यात शिवचरित्रावर आधारित जिवंत देखाव्यांसह शिवकालीन साहसी खेळांचे प्रात्यक्षिकही नाशिककरांना पाहावयास मिळणार आहे.

my-nashik-whatsapp

 

LEAVE A REPLY

*