शिल्पा-राज कुंद्राने ठोकला १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा

0

कापड व्यापारी रवि मोहनलाल भलोटियाने केलेल्या आरोपामध्ये त्याने शिल्पा, राज कुंद्रा यांनी इतर तीन (दर्शित इंद्रवदन शाह, उदय कोठारी, वेदांत बाली) यांनी आपल्याला २४ लाखांचा गंडा घातल्याचे म्हटले होते.

या सर्वांनी मिळून आपल्या नावाने पैसे घेतले खरे पण, ते पैसे काही आपल्यापर्यंच आलेच नाहीत, असा आरोप भलोटियाने केला होता.

इतकंच नव्हे तर भलोटियाने जाहीरपणे राज आणि शिल्पा यांना काही अपशब्द आणि अपमानास्पद वक्तव्य करुनही संबोधलं होतं.

हा सर्व प्रकार पाहता राज कुंद्राने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्याने दाखल केलेल्या याचिकेविषयी प्रवक्त्यांनी केलेल्या विधानानुसार राज आणि शिल्पाने रवि मोहनलाल भलोटियावर १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे.

LEAVE A REPLY

*