Type to search

जळगाव

शिरसोलीच्या तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत आढळला मृतदेह

Share

जळगाव | तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील २५ वर्षीय तरुणाचा शिरसोली रामदेववाडी दरम्यान असलेल्या नेव्हरे शिवारात संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आल्याची घटना दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. डिंगबर उर्खडू भिल वय २५ असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील शिरसोली-रामदेववाडी दरम्यान गुरुवारी दुपारी रस्ता लुटीची घटना घडली. त्यानुषंगाने पोलीसांचा तपास सुरु असतांनाच नेव्हरे शिवारात जंगलात डिंगबर भिल या तरुणाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला. पोलीसांनी घटनेच्या अनुषंगाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. परंतू पोलीसांना कुठलाही सुगावा मिळून आला नाही. मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने डिवायएसपी डॉ. निलाभ रोहन, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांनी या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर सायंकाळी उशिरा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!