Type to search

धुळे

शिरपूर वरवाडे नगर परिषदेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Share

शिरपूर । स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या उत्तम कामगिरीमुळे व प्रभावी अंमलबजावणी मुळे शिरपूर शहराने नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष बाब म्हणजे केंद्र शासनाने शिरपूर शहराला संपूर्ण भारत देशात राष्ट्रीय पातळीवर 49 वे उत्कृष्ट शहर व संपूर्ण पश्चिम भारतात 39 वे उत्कृष्ट शहर घोषित केले असल्याने मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

शिरपूरच्या सर्व नागरिकांसाठी अभिमानाची व भूषणावह अशी ही बाब आहे असे लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार वितरण समारंभात लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, मुख्याधिकारी अमोल बागुल यांना मुंबईत दि. 23 जुलै रोजी गौरविण्यात आले. यावेळी राज्याचे अर्थमंत्री ना. सुधीर मनगुंटीवार, नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर, नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, न.पा. प्रशासन संचालक एम. शंकर नारायण व मान्यवर उपस्थित होते.

शिरपूर शहर उत्कृष्ट पुरस्कार घेतांना नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, मुख्याधिकारी अमोल बागुल, नगर अभियंता माधवराव पाटील, नोडल ऑफिसर सागर कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र अहिरे, आरोग्य सहाय्यक दिपाली साळुंके उपस्थित होते.

आ. अमरिशभाई पटेल यांनी 1985 पासून सर्वांना हेवा वाटावा असे शिरपूर शहर बनविण्याचा नेहमीच यशस्वी प्रयत्न केला असून शहरवासीयांनी देखील वेळोवेळी त्यांना साथ दिली आहे. स्वच्छ, सुंदर व हरित शिरपूर हे अनेक चांगल्या सोयी सुविधांमुळे अनेकांनी आपल्या पसंतीचे शहर म्हणून नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले आहे.

स्वच्छ शिरपूर, सुंदर शिरपूर, हरित शिरपूर कायमस्वरूपी राहण्यासाठी स्वच्छतेचा वसा कायमस्वरूपी जपण्याचे आवाहन नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी दिले. तसेच सातत्याने व नियमितपणे नगरपरिषदेचे कामकाज आदर्शवत सुरु ठेवले आहे.

केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानात आतापर्यंतच्या सर्वात मोठया मोहीमेत दरवर्षी शिरपूर नगर परिषदेने उल्लेखनीय काम केले आहे.

यापूर्वी देखील शिरपूर नगर परिषदेला शासनाचे अनेक बक्षिसे मिळाल्याने देशात व राज्यात नामांकित शहरांपैकी शिरपूरने आपले आदर्शवत स्थान कायम राखले आहे.

महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात 2002-2003 मध्ये व 2005-2006 मध्ये शिरपूर नगर परिषदेला महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे बक्षिस देवून गौरविले होते. तसेच तसेच 2003-2004 मध्ये राज्यस्तरीय पाणी पुरवठा व्यवस्थापनेसाठी शिरपूर नगरपरिषदेला उत्कृष्ट क्षत्रिय पुरस्कार देवून गौरविले होते. त्यानंतर दि. 3 फेब्रुवारी 2016 रोजी महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानात स्वच्छ शहर हगणदारीमुक्त शहर म्हणून शिरपूर नगरपरिषदेला 1.50 कोटी रुपयांचे अनुदान व विशेष पारितोषिक देवून गैरविण्यात आले होते. त्यानंतर 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रथम व विभागातील प्रथम क्रमांकाचे 3 कोटी रुपयांचे बक्षिस देवून गौरविले होते. तसेच वसुंधरा-2018 पुरस्कार हा महाराष्ट्र राज्यातील प्रथम पुरस्कार देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. याशिवाय अनेक पुरस्कारांनी शिरपूर नगर परिषदेला सन्मान प्राप्त झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!