शिरपूर येथे उद्योजक निर्माण कार्यशाळा उत्साहात

0

शिरपूर / शेतकरी बांधवांनी शेती व्यवसायासोबतच विविध मार्गाने प्रगती साधण्यासाठी आ.अमरिशभाई पटेल, आ.काशिराम पावरा व प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर येथील आर.सी.पटेल फार्मसी कॉलेजच्या मैदानावर शेती व शेती-पूरक व्यवसायातील उद्योजक निर्माण कार्यशाळा उत्साहात झाली.

कार्यशाळेचे उद्घाटन आ.अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले.

याप्रसंगी सुरुवातीस आ.अमरिशभाई पटेल म्हणाले की, शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी व नागरीकांसाठी विविध योजना व उपक्रम राबविले.

तालुक्यात चांगले दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून शेतीसाठी मुबलक पाण्याचे काम यशस्वी केले आहे.

शिरपूर शहर व तालुक्याची मोठी ओळख सर्वत्र निर्माण केली. सर्व शेतकरी बांधवांनी शेतीसाठी नवनवीन तंत्रांचा वापर करावा, असे आवाहन यावेळी आ.पटेल यांनी केले.

प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीने मातीचे ऋण फेडण्यासाठी आपले योगदान देणे महत्वाचे आहे.

सतिष परब व त्यांच्या टीमचे कार्य खूपच उल्लेखनीय आहे.शेतकरी बांधवांनी शेतीसह जोडशेतीचे महत्व् समजून घेवून आपल्या प्रगतीसाठी मार्गक्रमण करावे.

सुवर्ण कोकण-सामर्थ्य महाराष्ट्राचे या चळवळीचे तज्ज्ञ सतिष परब यांनी शाश्वत श्रीमंतीचे रहस्य्, शेती उद्योगातील प्रचंड श्रीमंती, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्य्-व्यवसाय व सेंद्रीय शेती या विषयावर मार्गदर्शन केले.

आ.अमरिशभाई पटेल व भुपेशभाई पटेल यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढून शिरपूर पॅटर्न व शिरपूरबद्दलची यशोगाथा नेहमीच प्रेरणादायी असल्याचे म्हणाले.

LEAVE A REPLY

*