Type to search

धुळे

शिरपूर मतदारसंघात पोलीस यंत्रणेची धडाकेबाज कारवाई

Share

शिरपूर । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश राज्यातून अवैध मद्य, शस्र तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

दि.18 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गुप्त माहिती वरून तालुक्यातील जोयदा गावात कार्यवाही करून एक लाख नऊ हजार किमतीचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे.

विधानसभा मतदानाच्या काळात दारूबंदी असल्याने विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारुचा साठा जोयदा गावामध्ये साठविला असल्याची गुप्त माहिती तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली होती त्यानुसार दि.18 ऑक्टोबर रोजी दुपारी शिरपूर तालुका हद्दीतील जोयदा गावात छापा टाकला असता सुरसिंग वाहर्‍या पावरा याने त्याच्या घरात देशी विदेशी मध्यप्रदेश निर्मिती इम्पेरियल रियल ब्ल्यू, रॉयल टॅग व टँगो पंच नावाचा सुमारे एक लाख 9 हजार 516 रुपये किंमतीचा दारूसाठा आढळून आला आहे. तो दारुसाठा तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी चालक पोलीस शिपाई योगेश गोविंद कोळी यांच्या फिर्यादीवरून संशयित सुरसिंग वाहर्‍या पावरा याच्या विरोधात तालुका पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवलदार वानखेडे करीत आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ, शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील,पीएसआय दीपक वारे, पोलीस लक्ष्मण गवळी, प्रकाश मोरे, संजय माळी, संजीव जाधव, योगेश दाभाडे, गोविंद कोळी यांनी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!