शिरपूर तालुक्यात पूर्वतपासणी शिबिर

0
धुळे । धुळे येथे होणार्‍या विनामूल्य अटल महा आरोग्य शिबीरासाठी पुर्व तपासणी शिबिराला दि 6 रोजी शिरपूर तालुक्यातील अर्थे येथून सुरुवात झाली. या शिबीराचे आयोजन डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

अर्थे येथील शिबीरात 824 रग्णांची पुर्व तपासणी करण्यात आली तर यातील अर्थे परिसरातील एकुण 309 रुग्णांना दि 16 रोजी धुळे येथील अटल महा आरोग्य शिबीरात पुढील उपचार व शस्त्रक्रियासाठी पाठविण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, राहुल रंधे, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष मनोज निकम, मिलींद पाटील,चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. जितेंद्र ठाकूर म्हणाले की शिरपूर तालुक्यातील जनेतेला आरोग्यच्या समस्यांपासुन दुर करणे हे प्रथम माझे कर्तव्य आहे.अनेकांना पैसे नसल्याने आरोग्य सुधारता येत नाही. यामुळे तालुक्यातील जनतेला नेहमीच जास्तीत जास्त शिबीर घेऊन जनतेचा फायदा होण्याचे काम मी करत आहे. विनामूल्य अटल महाशिबीरात शिरपूर तालुक्यातील गरजु रुग्णांनी उपचार घ्यावा यासाठी शिरपूर तालुक्यात 6 ठिकाणी पुर्व तपासणी शिबिर घेण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*