Type to search

धुळे राजकीय

शिरपूर तालुक्यातील बारा ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा निकाल

Share

शिरपूर । करवंद ग्रामपंचायतीत एका जागेवर पोटनिवडणुकीत एकनाथ रामदास वाघ हे 257 मते मिळवून निवडून आले तर संतोष भिमराव खंडारे 206 मते मिळवून पराभूत झाले.

चांदसे-चांदसूर्या (एक जागा) तात्या रेला पावरा (विजयी), रेतम रायमल पावरा (पराभूत), हेंद्रयापाडा (एक जागा) भोनल्या जिरबान पावरा (विजयी), गीता मोहन पावरा, (पराभूत), चाकडू (दोन जागा) कवरसिंग चंपालाल मुखडे, सुनील प्रताप मुखडे (विजयी), अरुण मणिलाल पावरा, सुक्राम फत्तेसिंग मुखडे (पराभूत).

तालुक्यातील वासर्डी या ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत आशा चंदर भील 272 मते मिळवून विजयी झाल्या तर पराभुत गोपाबाई लखू भील यांना 198 मते मिळाली. तर सात सदस्य पदासाठी निवडणूक झाली. यात चार जागांसाठी एकही अर्ज न आल्यामुळे त्या चारही जागा रिक्त राहिल्या. तर उरलेल्या तीन जागांसाठी सदस्य पदासाठी मच्छिंद्र मंगा भील, रामभाऊ देवसिंग नाईक निवडणूकीत विजयी झालेत तर चंदर गंगाराम भिल हे बिनविरोध निवडून आले आहेत.

बिनविरोध सदस्य –
बलकुवा – अनुबाई देवमन भिल, पळासनेर – बापू शिवा भिल, बाभुळदे – शांतीलाल भिका महाजन, संजय संपत पाटील, शेमल्या – वंजारीबाई कालसिंग पावरा, ढेबडा सुमार्‍या पावरा.

तालुक्यात बारा ग्रामपंचायतीत 16 जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे तर वासर्डी ग्रामपंचायतीची पूर्ण निवडणूक घेण्यात येत आहे. बारा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत 16 निवडणूक होत आहे.तसेच कुवे, अजनाड, चांदपुरी या ग्रामपंचायतीत प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत होती मात्र या ग्रामपंचायतीत एकही अर्ज न आल्यामुळे या जागा रिक्त राहिल्या तर नांथे ग्रामपंचायतीत दोन जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे मात्र या ग्रामपंचायतीत एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे येथील दोन्ही जागा रिक्त राहिल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!