Type to search

धुळे

शिरपुरच्या नृत्य कलाकारांची मुंबईमध्ये मजल

Share

शिरपूर । दिल्ली दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार्‍या धिना धिन धा… या भारतीय लोकनृत्य स्पर्धेत शिरपूर येथील क्रिष्णकला अकादमीच्या ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकावला असून अंतिम फेरीत आपले स्थान सुनिश्चित केले.

या स्पर्धेत क्रिष्णकला ग्रुपने पावरा समाजाचे पारंपरिक पावरी नृत्य सादर केले. कार्यक्रमात पावरी नृत्याचे संगीत, पोशाख व नृत्या मधील वेगळेपण हे मुख्य आकर्षण ठरले व परिक्षकांनाही मंत्रमुग्ध केले. या नृत्याला प्रशिक्षण क्रिष्णकला अकादमीचे प्रशांत बागुल यांनी केले.

ग्रुपमध्ये आर.सी.पटेल संकुलाचे व अकादमीच्या सदस्यांचा सहभाग होता. त्यात रोहित बागुल, सागर वाघ, दीपिका बागुल, अंजली पगारे, मानसी पाटील, युक्ता गवळी, स्वप्निल ढोले, पिंकी पावरा, प्रभा चव्हाण, शालमसिंग पावरा यांचे विशेष सहकार्य लाभले. लवकरच सह्याद्री वाहिनीवर याचे प्रक्षेपण होईल, असे कार्यक्रमाचे डायरेक्टर यानी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!