शिक्षणामुळेच महिला सक्षम -चर्चासत्रात सूर : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘दै.देशदूत’तर्फे नऊ दंततज्ञ महिला डॉक्टरांचा सन्मान

0

जळगाव | प्रतिनिधी :  शिक्षणाअभावी महिलांमध्ये विचारांची विषमता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात अद्यापही शिक्षणाचा अभाव आहे. शहरी भागातील महिला सक्षम झाली असली तरी ग्रामीण भागातील महिला सक्षम नाही.  त्यामुळे महिलांना सक्षम करण्यासाठी शिक्षण देणे, त्यांचे प्रबोधन करणे, आवश्यक असल्याचा सूर शहरातील दंततज्ञ महिला डॉक्टरांनी व्यक्त केला. दरम्यान, जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘दै.देशदूत’तर्फे मान्यवर महिलांचा सन्मान करण्यात आला.

दै.देशदूतच्या मुख्यकार्यालयात महिला दिनाच्या पूर्वसंध्येला चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ.ज्योत्सना ओसवाल, डॉ.सिमरन जुनेजा, डॉ.अर्चना कोतकर, डॉ.एकता अग्रवाल, डॉ.प्रियंका भन्साली, डॉ.किरण फेरवाणी, डॉ.शितल मंडोरा, डॉ.पल्लवी मोरे, डॉ.सोनिया कटोरे उपस्थित होत्या.

प्रारंभी दै.देशदूतचे संपादक हेमंत अलोने, व्यवस्थापक मनिष पात्रीकर यांच्या हस्ते मान्यवर महिला डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविकात संपादक हेमंत अलोने यांनी चर्चासत्राबाबत भूमिका विषद केली. निवेदन शहर प्रमुख डॉ.गोपी सोरडे यांनी केले. आभार व्यवस्थापक मनिष पात्रीकर यांनी मानले. यावेळी डॉ.अभय चौधरी, डॉ.राहुल भन्साली, डॉ.मोरे, डॉ.कटोरे देखील उपस्थित होते.

डॉ.ज्योत्सना ओसवाल

शिक्षणामुळेच महिला सक्षम झालेल्या आहेत. ग्रामीण भागात अजूनही पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा आहे.

DSC_4621

महिलांना कुटूंब सांभाळून सर्व स्तरावर जबाबदारी पार पाडावी लागते. असे मत दंततज्ञ डॉ.ज्योत्सना ओसवाल यांनी व्यक्त केले.

 

 

 

डॉ.सिमरन जुनेजा

ग्रामीण भागामध्ये महिलांमध्ये शिक्षणाचा अभाव आहे. मात्र इच्छा शक्तीमुळे महिला सक्षम आहेत.

DSC_4623

पुरुषाच्या बरोबरीने सामाजिक कार्यात महिला अग्रेसर आहेत. अशी भावना डॉ.सिमरन जुनेजा यांनी व्यक्त केली.

 

 

 

डॉ.अर्चना कोतकर

ग्रामीण भागातील मुली केवळ लग्नासाठी चांगला मुलगा मिळावा, म्हणून शिक्षण घेतात. अशी मानसिकता आहे.

DSC_4625

त्यामुळे ही मानसिकता बदलविणे आवश्यक आहे. अशी भूमिका डॉ.अर्चना कोतकर यांनी मांडली.

 

 

 

डॉ.एकता अग्रवाल

महिला सक्षमीकरणासाठी प्रबोधन करणे, आवश्यक आहे. स्त्री-पुरुष समानता असली तरी पुरुष प्रधान संस्कृती अद्यापही गेलेली नाही.

DSC_4630

महिलांमध्ये इच्छा शक्ती देखील महत्वाची असल्याचे मत डॉ.एकता अग्रवाल यांनी व्यक्त केले.

 

 

 

डॉ.प्रियंका भन्साली

महिलांमध्ये काहीतरी करुन दाखविण्याची जिद्द पाहिजे.

DSC_4632

महिला आज मागे नाही तर पुरुषाच्या बरोबरीने आहे. सक्षमीकरणासाठी शिक्षण महत्वाचे असल्याचे मत डॉ.प्रियंका भन्साली यांनी व्यक्त केले.

 

 

 

डॉ.किरण फेरवाणी

महिलांना स्वत:चे कार्य करुन कुटूंबाची जबाबदारी देखील पार पाडावी लागते. आणि सक्षमपणे ती पेलू शकते.

DSC_4637

ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी  प्रबोधनाची गरज असल्याचे मत डॉ.किरण फेरवाणी यांनी व्यक्त केले.

 

 

 

 

डॉ.शितल मंडोरा

सर्ंघष हा प्रत्येकांमध्ये आहेच. परंतु महत्व कशाला दिले गेले पाहिजे, हे समजून घेणे आवश्यक आहे.

DSC_4642

प्रत्येक महिलांनी स्वत:ला महत्व देवून सिद्ध करावे, अशी भूमिका डॉ.शितल मंडोरा यांनी व्यक्त केली.

 

 

 

डॉ.पल्लवी मोरे

ग्रामीण  भागात शिक्षणाची अडचण आहे. शिक्षणाबाबतची माहिती पोहचत नाही.

DSC_4643‘चुल आणि मुल’ या चाकोरीत न राहता. सक्षमपणे महिलांनी करियर करणे, आवश्यक असल्याचे मत डॉ.पल्लवी मोरे यांनी व्यक्त केले.

 

 

 

डॉ.सोनिया कटोरे

ग्रामीण भागातील महिला सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध योजना पोहचल्या पाहिजे.

DSC_4648

शिक्षणाबरोबरच जिद्द आणि इच्छा शक्तीही महत्वाची आहे. असे मत डॉ.सोनिया कटोरे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*