शिक्षणविस्तार अधिकारी करणार पदोन्नतीसाठी आंदोलन

0

नगरला राज्य कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरसह राज्यातील शिक्षण विस्तारअधिकार्‍यांनी पदोन्नतीसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी नगरला शिक्षण विस्तार अधिकार्‍यांची राज्य कार्यकारणीची सभा पार पडली. यावेळी विस्तार अधिकार्‍यांचे सातार्‍याला राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

 
जिल्हा शिक्षक बँकेच्या सभागृहात रविवारी ही राज्य कार्यकारणी सभा पारपडली. यावेळी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संजय थोरात, कार्याध्यक्ष रमजान पठाण, सरचिटणीस प्रफुल भंडारकर आदी उपस्थित होते. गेल्या अनेकवर्षापासून शिक्षण विस्तार अधिकार्‍यांचे गट शिक्षणा अधिकारी ते उपशिक्षणाधिकारी असे पदोन्नती रखडलेली आहे. मराठवाड्यात विस्तार अधिकार्‍यांची शिक्षक पदाचा सेवा काळ विस्तारअधिकारी पदाच्या सेवाकाळात गृहीत धरण्यात येत असल्याने विस्तार अधिकार्‍यांच्या पदोन्नती रखडली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

 
यासह विस्तार अधिकार्‍यांचा प्रवास भत्ता आणि प्रश्‍न प्रलंबित असून यासाठी लढा देण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष पठाण यांनी यावेळी सांगितले. बैठकीला सर्व राज्याचे जिल्हाध्यक्ष आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

 
नगरमधून जिल्हाध्यक्ष शिवाजी कराड, विस्तार अधिकारी अभयकुमार वाव्हळ, बापूसाहेब वाकचौरे, चंद्रकांत सोनार, अनिल भवर, सविता कचरे, रवी कापरे, ज्ञानेश्‍वर कलगुंडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*