Type to search

नंदुरबार

शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीतर्फे एकदिवशीय धरणे आंदोलन

Share

नंदुरबार | नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचा प्रलंबित मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक, शिक्षकेत्तर समन्वय समितीतर्फे एक दिवशीय आंदोलन करण्यात आले.

यासंदर्भात संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्मचार्‍यांच्या अनेक न्याय मागण्यांकडे शासन जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याने महाराष्ट्रातील निमशासकीय, शासकीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची वज्रमुठ तयार झाली आहे. अंशदायी पेन्शन योजना ही कुटूंबिय व्यवस्था उधवस्त करणारी योजनेबाबत वारंवार न्यायाची भुमिका मांडत आहे. तरी शासनाने समन्वय समितीच्या सुचविलेल्या मागण्यांबाबत त्वरीत उपाय योजना करावी. असे म्हटले आहे. यावेळी संघटनेतर्फे जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर कराव्यात, खाजगी, कंत्राटी करून धोरण रद्द करून राज्यातील सर्व कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करावे, केंद्रप्रमाणे सर्व भत्ते मिळावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या. दि.५ सप्टेंबर शिक्षक दिनापासून काळया फिती लावून निषेध नोंदवला होता. आज रोजी एक दिवशीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. यावरही शासनाने दखल न घेतल्यास दि.११ सप्टेंबरपासून राज्यातील शासकीय, निमशासकीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर जातील व उद्वणार्‍या परिस्थितीला शासन सर्वस्वी जबाबदा राहिल. असा इशारा यावेळी देण्यात आला.

जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीसमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ संभाजीराव थोरात गट, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गट, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य पदविधर संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यासह ३० संघटना सहभागी झाल्या होत्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!