शिक्षक बँक सभासदांचा रक्कम कपातीस विरोध

0

पारनेर (प्रतिनिधी) – शिक्षक बँकेचे सत्ताधारी गुरुमाऊली मंडळ विकास मंडळाची नवीन ऐतिहासिक वास्तू बांधण्याच्या नावाखाली प्रत्येक सभासदाच्या कायम ठेवीतून 10 हजार इतकी रक्कम विकास मंडळाकडे वर्ग करण्याचा घाट घालण्याचा कारभार सुरू आहे. याविरोधात जिल्हाभर सह्यांची माहीम राबविण्यात येणार असून कायम ठेवीतून पैसे द्यावे वाटत नसल्यास सही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक शाळेवर पत्रक पाठविण्यात आले आहे.

 

 

अनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक व विकास मंडळ या दोन स्वतंत्र संस्था आहेत. रक्कम काढण्याच्या निर्णयावर 27 जुलै रोजी विकास मंडळ कार्यालयात सर्वच मंडळाच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बँकेचे चेअरमन रावसाहेब रोहोकले तसेच विकास मंडळाचे अध्यक्ष संजय शिंदे, गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, आबासाहेब जगताप हे उपस्थित होते. परंतु यावेळी विरोधी मंडळाच्या सर्वच प्रमुखांनी सभासदांच्या कायम ठेवीतून नवीन वास्तूसाठी प्रत्येक सभासदांची वैयक्तिक परवानगी असेल तरच आपणास सदरील सक्कम कपात करता येईल अन्यथा नाही, असा इशारा दिला आहे.

 

 

तसेच बँकेच्या वाढलेल्या व्याजदरास सर्वांनी कडाडून विरोध केला. तर व्याजदर 9.5 करावा, अशी एकमुखी मागणी सर्वच उपस्थितांनी केली. सह्यांच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन सदिच्छा मंडळाचे नेते राजेंद्र शिंदे, रवींद्र पिंपळे, बाळासाहेब खिलारी, गोकुळ कळमकर, ज्ञानेश्वर माळवे, संतोष खामकर, उद्धव मरकड, बाबा आव्हाड, राजू कुंदन, शैलेश खणकर, कारभारी बाबर, गौतम साळवे, गुरुकुलचे नेते संजय कळमकर, संजय धामणे, रा.या औटी, संभाजी औटी, बा.ठ झावरे, सुनील बनोटे, भास्कर नरसाळे, ऐक्य मंडळाचे नेते विजय काकडे, रामदास भापकर, कल्याण राऊत, अंबादास काकडे, दादाभाऊ कोल्हे, आखिल भारतीय ऐक्यचे नेते राजेंद्र निमसे, बाळासाहेब कदम, लक्ष्मण मटे, सुनील पवळे, इब्टा संघटनेचे नेते आबा लोंढे, एकनाथ व्यवहारे, काटकर या सर्वांनीच या अनधिकृत कपातीस विरोध दर्शविला आहे.

 

उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर श्री अनिल कुमार दाबशेडे यांना दि 1 ऑगस्ट 2017 रोजी निवेदन देण्यात आले आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत या चुकीच्या पद्धतीने होणार्‍या ठरावास सर्वच विरोधी मंडळांचा कडाडून विरोध असणार आहे. गटनिहाय व केंद्र निहाय स्वाक्षरी मोहीम सुरू केली असल्याचे बाळासाहेब खिलारी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*