Type to search

ब्लॉग

शिका मेंदूतील मायक्रोचिपद्वारे!

Share

दैनंदिन जीवनात प्रत्येकाला कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करता यावा या उद्देशाने जगभरातील अनेक संशोधकांचे आणि उद्योगांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामधील एक स्टार्ट अप म्हणजे ङ्गाऊंटेक डॉट ए आय. याचे संस्थापक आणि सीईओ निकोलस कैरिनो यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि व्यक्तीच्या गरज आणि क्षमतेप्रमाणे शिक्षणदेखील ‘टेलरमेड’ पद्धतीने देणे सहज शक्य आहे. जागतिक पातळीवर होणारे बदल स्वीकारणे हाच आता काळाबरोबर राहण्याचा मूलमंत्र बनला आहे. सध्या आपण संगणकीय क्रांतीचे परिणाम, स्मार्टङ्गोनच्या रूपाने मानवी जीवनाच्या विविध पैलूंवर झालेले परिणाम पाहत आणि अनुभवत आहोत. या दोन बाबींनी आता आपले आयुष्य व्यापले आहे. कधीकाळी या गॅझेटस्शिवाय आपण राहत होतो, जगत होतो हा विचारही आपल्या विचार कक्षेच्या पलीकडचा वाटतो. ङ्गार मोठ्या कामांसाठीच नव्हे तर अगदी दैनंदिन कामांसाठीही आपले संगणक आणि स्मार्टङ्गोनवरचे अवलंबित्व वाढले आहे. मात्र प्रगतीचे वारे इथे थांबलेले नाही अथवा थांबणारही नाही.

सध्या औद्योगिक क्षेत्रात अतिशय वेगळे आणि विस्तृत बदल होत आहेत (आर्टिङ्गिशिअल इंटेलिजन्स ऊर्ङ्ग संगणकीय बुद्धिमत्ता तसेच इतर काही बाबींमुळे) आणि त्यांचे परिणाम अंतिमतः आपल्या सर्वांच्या वैयक्तिक जीवनावरही होणार आहेत. ही दृश्य तसेच अप्रत्यक्ष परिवर्तने ङ्गार मोठी आहेत. गेल्या दहा एक वर्षांमध्ये आर्टिङ्गिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच संगणकीय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता या शब्दप्रयोगाचा वाढता वापर सर्वत्र दिसत आहे. खरे तर मोठ्या संगणकीय प्रणालीशी संबंधित विविध व्यवहारांमध्ये तसेच बॅक ऑङ्गिस ऊर्ङ्ग पडद्यामागील अनेक कामांमध्येही संगणकीय बुद्धिमत्तेचा वापर आधीपासूनच सुरू आहे. त्याचे प्रमाण बर्‍यापैकी मोठे आणि विस्तृत आहे. परंतु गेल्या दशकापासून स्मार्टङ्गोन्सचा वापर वाढल्यानेही असेल कदाचित; पण सर्वसामान्यांच्या अनेक दैनंदिन कामांमध्ये या संगणकीय प्रज्ञेचे अस्तित्व जाणवू लागले आहे. त्यामुळेच त्याबद्दल जास्त माहिती मिळवण्याची उत्सुकता असून तशी गरजही निर्माण झाली आहे. आर्टिङ्गिशिअल इंटेलिजन्स प्रत्येक क्षेत्रात वापरला जातो आहे हे खरे. अर्थात, अनेक ङ्गायदे स्पष्ट झाल्यामुळेच त्याचा वापर वाढत आहे. संरक्षण, कायदा, संशोधन, उत्पादन प्रक्रिया, वैद्यकशास्त्र इत्यादीप्रमाणेच आता आणखी एका क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे क्रांतिकारी बदल झालेले दिसणार आहेत. हे म्हणजे शिक्षण क्षेत्र.

शिक्षण म्हटल्यावर साहजिकच अगदी पहिल्या-दुसर्‍या इयत्तेतल्या अक्षरओळखीपासून पीएच.डीपर्यंतचा वीस-पंचवीस वर्षांचा प्रवास डोळ्यांपुढे उभा राहतो. शाळा दूर असणे, ङ्गी भरायला पैसे नसणे, शिक्षक चांगले नसणे, विषय न समजणे किंवा न आवडणे या आणि अशा इतरही खडतर पायर्‍या ओलांडून चिकाटीने शिक्षण पूर्ण करणे सोपे नाही. शिक्षणापासून अनेक लोक वंचित राहण्याचे किंवा दूर जाण्याचे प्रमाण खूप मोठे असण्यामागे हे घटक निर्विवादपणे कारण आहेत. पण लवकरच म्हणजे साधारणत: येत्या वीस वर्षांमध्ये हे सगळे बदलण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. ‘गुगल ब्रेन इंप्लांट’ म्हणजेच मेंदूत बसवण्याच्या ‘चिप’मुळे आता कोणीही थोड्या वेळातच काहीही शिकू शकेल. त्यासाठी कॉलेजमध्येच नव्हे तर शाळेतही जाण्याची गरज नाही. रात्र रात्र जागून अभ्यास आणि पाठांतर करण्याची गरज तर मुळीच नाही!

अगदी दैनंदिन जीवनातही प्रत्येकाला कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करता यावा आणि अनुभव घेता यावा या उद्देशाने जगभरातल्या अनेक संशोधकांचे आणि उद्योगांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामधले एक स्टार्टअप म्हणजे ङ्गाऊंटेक डॉट एआय. याचे संस्थापक आणि सीईओ निकोलस कैरिनो यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि व्यक्तीच्या गरज आणि क्षमतेप्रमाणे शिक्षणदेखील ‘टेलरमेड’ पद्धतीने देता येणे सहजशक्य आहे. अर्थातच यातून मिळालेले शिक्षण अधिक उपयुक्त, ङ्गलदायी आणि अर्थातच आनंददायी असेल. कैरिनो यांच्या म्हणण्याप्रमाणे, एखादी शंका किंवा प्रश्‍न विचारण्यासाठी तो गुगल किंवा इतरत्र टाईप करण्याची गरजही आता उरणार नाही. कारण प्रश्‍नकर्त्याच्या मेंदूतल्या ‘आर्टिङ्गिशयल इंटेलिजन्स इंप्लांट’मुळे लगेचच उत्तर मिळू शकेल. त्यामुळे घोकंपट्टीची गरजच संपणार आहे. शिवाय यामुळे पाठ्यपुस्तके आणि परीक्षा या बाबीही कदाचित अस्तित्वात राहणार नाहीत!

तसे पाहता सध्याच्या ऍण्ड्रॉईड स्मार्टङ्गोन्समध्ये ‘गुगल असिस्टंट’ दिलेला असतो. तो वापरकर्त्याच्या मेंदूतच बसवल्यासारखी स्थिती निर्माण होईल, असे म्हणायला हरकत नाही. यामुळे ८ ते ८० वर्षांदरम्यानच्या कोणत्याही व्यक्तीला हवा तो विषय तिच्या सोयीच्या गतीने आणि पद्धतीने, हव्या त्यावेळी आणि हव्या त्या ठिकाणी बसून शिकणे शक्य होणार आहे. आपला विद्यार्थी कोणत्या विषयात हुशार आहे आणि कुठे मंद आहे, कोणत्या पद्धतीने सांगितले तर त्याला जास्त चांगले समजते हे बसवलेल्या Aमायक्रोचिपला अनुभवाने (म्हणजेच काही महिन्यांच्या संवादानंतर) कळू लागेल. गरजेनुसार अगदी शिक्षकाच्या आवाजात आणि सांगण्याच्या पद्धतीमध्येही सुधारणा करता येईल. परिणामी पुरवल्या जाणार्‍या शिक्षणाचा दर्जा उंचावेल, असाही कैरिनो यांचा दावा आहे. हे सर्व बदल शक्य कोटीतले (म्हणजे येत्या दहा-वीस वर्षांमध्येच अनुभवण्याजोगे) असतील तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षण क्षेत्रातला वापर खरोखरच क्रांती घडवेल यात शंका नाही. कारण जगातले अनेक लोक अशिक्षित किंवा अर्धशिक्षित असण्यामागची प्रमुख कारणे लेखाच्या सुरुवातीलाच दिली तीच आहेत. पारंपरिक विचारसरणी आणि कार्यपद्धतीमध्ये ती दूर होणे अवघडच आहे. शिवाय ‘ङ्गाऊंटेक’च्या म्हणण्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रातल्या मेंदूतA कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी चिप बसवण्याच्या संकल्पनेचा गैरवापर होण्याची शंका काहींच्या मनात येऊ शकते. त्यात काही चुकीचेही नाही. परंतु त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीही शोधल्या जातील. तसे पाहिले तर स्मार्टङ्गोन आणि सोशल मीडियाचाही गैरवापर होत आहेच. परंतु म्हणून ही माध्यमे वापरणे कोणी सोडलेले नाही!
deepak@deepakshikarpur.com
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!