शिकवणीला जाणाऱ्या जुळ्या बहिणींचा अपघात ; एकीची प्रकृती गंभीर

0

सटाणा : सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ठेंगोडा येथून सटाणा येथे शिकवणीसाठी येत असतांना अज्ञात वाहनाच्या चुकीमुळे घडलेल्या अपघातात दोघंही बहिणी एकमेकांच्या विरुद्ध दिशेला फेकल्या गेल्या. या अपघातात दोन्ही बहिणी जखमी झाल्या आहेत.

अपघात घडल्यानंतर या रस्त्यावरून एक मालट्रक येत होता. मालट्रकचे चाक एका बहिणीच्या हात आणि पायावर चालून गेल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. तिला नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून देण्यात आली आहे.

हा अपघात सटाणा शहरातील जिजामाता उद्यानाजवळ घडला. अपघातात जखमी जुळ्या बहिणींची नावे वैष्णवी आणि गीता नितीन भावसार अशी आहेत.

सटाणा पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरु असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*