शाहू मोडक करंडकाचा बिगूल वाजला

0

सप्टेंबरमध्ये रंगणार एकांकिका स्पर्धा, 15 ऑगस्टला अंतिम प्रवेश

अहमदनगर (प्रतिनिधी)– कलायात्रिक आणि नाट्यजल्लोष यांच्या वतीने नटश्रेष्ठ शाहू मोडक करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा सुरू करण्यात आली. यंदा स्पर्धेचे 7 वे वर्ष आहे. सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा होणार असून 15 ऑगस्टपर्यंत नावनोंदणी करता येईल, असे प्रवीण कुलकर्णी यांनी सांगितले.
स्पर्धेबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, गेल्या वर्षीपासून या स्पर्धेमध्ये औरंगाबाद आणि नाशिक येथील महाविद्यालयांना सुद्धा प्रवेश देण्यात आला आहे. गेल्या वर्षी औरंगाबाद आणि नाशिक येथून सुमारे 6 संघ सहभागी झाले होते. खरंतर या दोन्ही ठिकाणी सुद्धा अनेक एकांकीका स्पर्धा होतात मात्र महाविद्यालयीन स्तरावर एकहि स्पर्धा होत नाही. खुल्या स्पर्धांमध्ये खुपदा नवीन महाविद्यालयीन कलाकार सहभागी होताना कचरतात. त्यांच्यासाठी आता शाहू मोडक स्पर्धा एक मैलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा श्री अमित खताळ यांनी व्यक्त केली.
दरवर्षी या स्पर्धेच्या निमित्ताने या नव कलाकारानंसाठी लेखनापासून ते सादरीकरणापर्यंत संपूर्ण माहिती देणारी एक कार्यशाळा आयोजित करण्यात येते. यात अनेक नामवंत कलाकार मार्गदर्शन करतात. यंदा सुद्धा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री प्रसाद बेडेकर यांनी दिली.
2015 साली या स्पर्धेचे उद्घाटन मा.मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. तो या स्पर्धेसाठी सुवर्णदिन होता. या स्पर्धेत दिली जाणारी पारितोषिके हे सुद्धा या स्पर्धेचे एक खास आकर्षण आहे. अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील नामवंत कलाकारांच्या नावाने हि पारितोषिके दिली जातात. यामुळे सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांना सुद्धा प्रोत्साहन मिळते आणि या कलाकारांची नव्याने ओळख होते, असे श्री अमोल खोले म्हणाले.
यंदा स्पर्धेची अंतिम फेरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरच्या माऊली संकुलात रंगेल. प्रवेशाची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2017 असून संघांनी लवकरात लवकर आपले प्रवेश निश्चित करावेत असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी 9422726156 , 9850057222 किंवा 9890903000 या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

*