शाहू खैरे काँग्रेस गटनेतेपदी

0

नाशिक : मनपामध्ये काँग्रेसच्या गटनेतेपदी नगरसेवक शाहू खैरे यांची निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काल ही घोषणा करण्यात आली.

महापालिका निवडणूकीत काँग्रेसचे सहा नगरसेवक निवडून आले आहे. त्यात शाहू खैरे यांचाही समावेश आहे. गतवेळीही मनपात त्यांच्याकडे काँग्रेसचे गटनेतेपद होत. त्यामुळे यावेळीही त्यांनाच या पदावर संधी मिळणार असे चित्र काँग्रेसमध्ये होते. मनपामध्य निवडून आलेल्या नगरसेवकांची गटनोंदणी उद्या होण्याची शक्यता आहे.

मुंबईत झालेल्या गटनेते निवड बैठकीत शहराध्यक्ष शरद आहेर यांच्यासह शोभा बच्छाव यांच्यासह नगरसेवक हेमलता पाटील, वत्सला खैरे, राहुल दिवे, समिर कांबळे, आशा तडवी, नरेश पाटील, बबलु खैरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*