Type to search

नंदुरबार

शाहीर हरिभाऊंच्या रुपाने सात्विक, क्रांतिकारी, समाजसुधारक गवसले

Share

नंदुरबार ।  कुठलाही वाद अथवा वेगवेगळ्या रंगाची शाहीरी भारतातील एकात्मतेला न्याय देऊ शकणार नाही. त्याला शाहीर हरीभाऊ पाटील अपवाद होते. त्यांची शाहीरी कुठल्याही रंगाला बळी पडली नाही त्यांची शाहीरी तिरंगा रंगाचे प्रतिनिधीत्व करीत होती. हरीभाऊंच्या रुपाने मला सात्विक क्रांतीकारी समाजसुधारक गवसला ते शहीद शिरीषकुमारच्या परंपरेतले असल्याने देशभक्त नागरीक घडविण्यासाठी त्यांचे साजेसे असे स्मारक नंदुरबारला झाले पाहिजे असे आवाहन, असे आवाहन 89व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

नंदूरबार येथील स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरीभाऊ पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कन्यादान मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महनिय वक्ते म्हणून बोलतांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. शालीनीताई बोरसे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. सुधाकर बोरसे, सेवानिवृत्त शल्यचिकित्सक डॉ. गुलाबराव एन. मराठे, सेवानिवृत्त सुपरिटेंडेट इंजिनिअर गो.शं. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, शाहीर हरीभाऊंनी चार धामाचे सुख आणि समाधान नंदनगरीत शोधले. शाहीरांना रंग, रुप, प्रान्त, जात, धर्म, नसतो. त्यांची शाहीरी ही धर्मातीत होती. कलावंताला दुय्यम स्थान देण्याची राजकारण्यांची राजकीय संस्कृती ही देशाला घातक आहे. शाहीर एका पक्षाला कधीही शरण जात नाही परंतु राजकारणी शाहीरांचा उपयोग केवळ गर्दी जमविण्यासाठी करतात. हल्ली वीर रसाची परंपरा खंडीत होत आहे. सर्वत्र हलकट गाणी वाजवली जातात. अशी खंत व्यक्ती करीत संविधान सुसंगत नागरीक तयार करावयाचा असेल तर डफाचा आवाज गावागावात गेला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उषाताई हरीभाऊंचे मानस पूत्र डॉ. दिपक अंधारे, प्राचार्य बी.एस. दादा पाटील, डॉ. सी.डी. महाजन, प्रा. एन. डी. नांद्रे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन चेतना बिरारीस यांनी केले. कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, ललीता सबनीस, माहिती उपसंचालक किरण मोघे, यशवंत पाटील, वकील पाटील, संदीप चौधरी, प्रभाकर नांद्रे, एस. एन. पाटील, एन.टी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे, प्रा. बी. ए. पाटील, हेमंत जाधव,साहित्यिक निंबाजीराव बागुल, नितीन पाटील, रणजित राजपुत यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. प्रारंभी स्वागत गीत सौ.म्हसावदकर  यांनी म्हटले. राम दाऊदखाने यांनी पसायदान म्हटल्यानंतर शेवटी प्राचार्य एन.डी. नांद्रे यांनी आभार मानले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!