शाहिद कपूरमुळे ‘पद्मावती’चे चित्रीकरण लांबणीवर!

0

पद्मावतीच्या चित्रीकरणामध्ये आता एक अडचण समोर येऊन उभी राहिली आहे.

शाहिदमुळे सिनेमाचे चित्रीकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पद्मावती’त शाहीद कपूर आणि रणवीर सिंग यांचे एक दृश्य चित्रीत करायचे होते. या दृश्यात हे दोघंही लढाईत परस्परांपुढे उभे ठाकतात.

आता युद्धाचे चित्रीकरण आहे म्हटल्यावर त्यासाठी पिळदार देहयष्ठी तर हवीच ना.. रणवीरला यासाठी फारशी मेहनच घ्यावी लागली नाही, कारण त्याचे शरीर पहिल्या काही भूमिकांमुळे आधापासूनच पिळदार होते.

शाहिदला मात्र त्याच्या शरीरावर फार काम करावे लागणार होते.

या दृश्याच्या चित्रीकरणासाठी योग्य अशी शरीरयष्ठी शाहिदची नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या दृश्याचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले.

LEAVE A REPLY

*