Type to search

धुळे

शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळवून देणार -आ. पावरा

Share

शिरपूर । माजी मंत्री अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून विकास योजना आपल्या दारी अभियान खाजगी खर्चाने सुरु करण्यात आले असून या योजनेतून हजारो बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे. कोणीही शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करीत आहोत. शिरपूर तालुका आरोग्याच्या दृष्टीने व अनेक सोयीसुविधांनी युक्त तालुका बनविण्यासाठी सर्व काम करीत आहे असे प्रतिपादन आ. काशिराम पावरा यांनी केले.

तालुक्यातील सुळे येथे  विकास योजना आपल्या दारी अभियान घेण्यात येऊन उपस्थित लाभार्थींना आ. काशिराम पावरा यांनी मार्गदर्शन केले. तसेच असंख्य लाभार्थी महिला पुरुषांचे विविध योजनांचे अर्ज भरून घेण्यात आले.

यावेळी आ. काशिराम पावरा म्हणाले की, थेट सर्वसामान्य लोकांपर्यंत शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहोत. नवीन रेशन कार्ड मोहीम व विभक्त रेशन कार्डसाठी आम्ही अंमलबजावणी सुरु केली आहे. घरकाम व बांधकाम करणार्‍या कामगार बांधवांना शासनाच्या योजनांसाठी संबंधित फॉर्म भरुन घेत आहोत. योजनेचे कार्यकर्ते यांच्याकडे प्रत्येकाने शासनाच्या सर्व योग्य ते अर्ज भरुन जमा करावे.

यावेळी सरपंच सिकराम पावरा, उपसरपंच रमेश पावरा, शांतीलाल पावरा, तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन भरवाड, हितेंद्र राजपूत, पोलीस पाटील देवराम थोरात, कैलास पावरा, निंबा गोपाळ उपस्थित होते. प्रास्ताविक सचिन चौधरी यांनी केले.

आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून शिरपूर तालुक्यातील गावांमध्ये व शहरात विकास योजना आपल्या दारी अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत असून हजारो लाभार्थी महिला पुरुषांना या योजनेमुळे शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला आहे.

कार्यक्रमास विकास योजना आपल्या दारी अभियानचे कार्यकर्ते, पंचक्रोशीतील अनेक गावांचे आजी माजी सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!