शासनाच्या अनुदानातून शिक्षकांना थकीत वेतन देण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

0

जळगाव | प्रतिनिधी :  महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याकारणाने शिक्षकांचे १४ महिन्याचे ५० टक्के वेतन थकले आहे. त्यामुळे शिक्षकांनी आयुक्तांविरुध्द दाखल केलेल्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात कामकाज झाले. दरम्यान मनपा शाळेच्या इमारतीचे ६ कोटीचे थकीत भाडे शासनाने द्यावे आणि या निधीतून शिक्षकांचे थकीत वेतन करावे, असे आदेश न्या.कोरडे, न्या. बोरा यांनी आयुक्तांना दिले.

मनपाची आर्थिकस्थिती बिकट असल्याने जोपर्यंत आर्थिकस्थिती सुधारत नाही तोपर्यंत ५० टक्केच वेतन देम्याबाबतचा धोरणात्मक निर्णय महासभेत घेण्यात आला होता. त्यानुसार शिक्षकांचे १४ महिन्याचे ५० टक्के वेतन महापालिकेकडे थकले आहे. वेतन मिळावे यासाठी शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

त्यानंतर खंडपीठाने वेतन देण्याबाबत आदेश देवूनही आयुक्तांनी वेतन दिले नाही. त्यामुळे शिक्षकांनी पुन्हा आयुक्तांविरुध्द अवमान याचिका दाखल केली. या याचिकेवर कामकाज झाले.

दरम्यान मनपा शाळेच्या इमारतीचे ६ कोटीचे थकीत भाडे शासनाने द्यावे आणि या निधीतून शिक्षकांचे थकीत वेतन करावे, असे आदेश न्या.कोरडे, न्या. बोरा यांनी आयुक्तांना दिले. तसेच शासनाकडे थकीत असलेल्या शाळा इमारतीच्या भाड्यासाठी मागणी करावी, असेही न्यायालयाने सांगितले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

*