शासकीय निधीचा अपहार करणार्‍या दोघांना अटक

0
जळगाव  / शासनाच्या निधीचा स्वताच्या फायद्यासाठी दुरुपयोग करून अपहार केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात दाखल असलेल्या गुन्हात पोलिसांनी दोघांना आज अटक केली आहे.
शासनाच्या सात लाखांच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी बाबुलाल चव्हाण, गोपाळ देविदास राठोड वय 32 व ईश्वर रंगलाल पवार वय 28 यांच्या विरुध्द सामाजिक न्याय भवनातील वसंतराव नाईक विकास महामंडळाचे हुसेन गोविंद अतराम यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिसात तिघांविरुध्द गुन्हा दाखल आहे.

यातील बाबुलाल चव्हाण याला यापुर्वी पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्हातील गोपाळ राठोड व ईश्वर पवार हे दोन्ही फरार होते.

या दोघांना दि.8 रोजी रामानंद पोलिसांनी अटक केली असून आज न्या.के.एस.कुळकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. हेमंत मेंडकी यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

*