शाळांची घंटा आजपासून खणखणार

0
जळगाव । दि. 14 । प्रतिनिधी-दोन महिन्यापासून शाळांना लागलेल्या सुट्या आज संपत आहे. त्यामुळे उद्यापासून शाळांची घंटा पुन्हा खणखणार असून विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू येणार आहे.
शाळेचा पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
उद्या दि 15 जुनपासून जिल्ह्यात सर्व शाळांना प्रारंभ होत आहे. शाळा बालकांचे भावविश्व घडविते. विद्यार्थ्यांच्या सामाजिक विकासाात व राष्ट्राच्या जडणघडणीत शाळेचे अद्वितीय स्थान आहे.

दिर्घ सुटयांच्या आनंदानंतर विद्यार्थी जेव्हा शाळेत येतील त्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे तसेच विद्यार्थ्यांचा शिक्षणातील टक्का वाढवा यासाठी शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना ‘शाळा प्रवेशोत्सवाचे’ आयोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.

त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी शाळा व्यवस्थापनांकडून करण्यात आली आहे. सुट्टयानंतर आता विद्यार्थ्यांना देखील शाळेची ओढ लागलेली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेचा परिसर स्वच्छ करून, सुंदर रंगरंगोटी करण्यात आली आहे.

गणवेशाची बिले दिल्यानंतर अनुदान
दोन गणवेशासाठी 400 रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर देण्यात येणार आहे. परंतु त्यासाठी गणवेशाची बिले मुख्याध्यापकांकडे सादर केल्यानंतरच 400 रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.

जवळपास 80 टक्के विद्यार्थ्यांनी बँकेत खाते उघडले असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. गणवेशासाठी 6 कोटी 38 लाखांचे अनुदान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे.

तालुकास्तवरून या अनुदानाचे वाटप होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*