शहीद स्मारकास अभिवादन

0

नंदुरबार । येथील शहिद शिरीषकुमार व त्याच्या साथीदारांच्या हौतात्म्यास 76 वर्ष पूर्ण झाल्याने शहिद स्मृती संस्थेतर्फे तर्फे विवीध मान्यवरांनी शहिदांना अभिवादन केले.

आज दि.9 सप्टेंबर रोजी शिरीषकुमार मेहता व त्यांच्या चार साथीदारांच्या हौतात्म्यास 76 वर्ष पूर्ण झाली.शहिद स्मृती संस्थेतर्फे गेल्या 51 वर्षापासुन 9सप्टेंबर हा दिवस कृतज्ञ स्मरण केले जाते त्या निमित्ताने दि.8 सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक वाचनालयात नई तालीम समिती सेवाग्रात आश्रम ाचे अध्यक्ष डॉ.सुमन बरंठ यांचे अभिवादन भाषण आयोजीत करण्यात आले होते.

आज येथील माणिक चौकात असलेल्या शहिद स्मारकाजवळ अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी,जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील डॉ.सुमन बरंठ, उपनगराध्यक्षा शोभाताई मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार,

भाजपा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी,डॉ.पितांबर सरोदे, अ‍ॅड.रमणभाई शहा,मनिष शहा,प्रा.राजेंद्र शिंदे,प्रदिप पारेख,निंबाजीराव, मुख्याध्यापिका सौ.सुषमा शाह, सुरेश माळी,बागुल,कैलास मराठे,प्रा.ईश्वर पाटील,हैदरभाई नुराणी,निलेश शहा,तुषार सोनवणे, पत्रकार दिपक कुलकर्णी, रमाकांत पाटील,शितल पटेल,जितेंद्र लुळे.राजुभाई सोमाणी,गोविंद अग्रवाल किर्तीकुमार सोलंकी, पांडुरंग माळी, आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस बँड पथक सहभागी झाला होता.बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

LEAVE A REPLY

*