Type to search

नंदुरबार

शहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली

Share

शाहदा | ता.प्र.- सिंहनाद पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणार्‍या आषाढी पौर्णिमेनिमित्त रविवारी शहाद्यातून संदेश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शेकडो बौद्ध उपासक व उपसिका सहभागी झाल्या होत्या.

सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी सारनाथ येथे आषाढ पौर्णिमेला तथागत बुध्द यांनी पाच परिव्राजकांना नवीन धम्मात दिक्षीत केले. त्या वारस्याचा कृतज्ञता सोहळा सिहनाद पौर्णिमेच्या रूपात साजरा करण्यात येतो. सिंहनाद पौर्णिमा बौद्ध राष्ट्रांमध्ये अतिशय उत्साहाने साजरी केली जाते. या पौर्णिमेच्या अनुषंगाने असलेल्या मूळ घटनेच्या स्मृतिंना उजाळा देणे व संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असलेला धम्मचक्र प्रवर्तनाचा संदेश सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी या संदेश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ.बाबासाहेब पुतळा ते बोधीवृक्ष परिसर, संभाजी नगर असा रॅलीचा मार्ग होता. रॅलीत शहादा शहरातील शेकडो बौद्ध उपासक व उपसिका पांढरे कपडे परिधान करून सहभागी भगवान बुद्धाच्या दया, क्षमा, शांतीचा संदेश दिला. रॅलीच्या अग्रस्थानी अमरावती येथिल पूज्य भन्ते कौडण्य होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली संपन्न झाली.समारोपीय स्थळी धम्मदेसना घेण्यात आली. संजय निकुंभे, विष्णू जोंधळे, दादाभाई पिंपळे, बिरारे आप्पा, श्री.लोंढे, गोटू महिरे, श्री.बिर्‍हाडे, अल्का जोंधळे, अर्चना निकुंभे, वैशाली पवार, सविता शिरसाठ, विजया पाटोळे, कविता कुवर आदींसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले. या रॅलीत राजमाता रमाई महिला मंच, प्रशिक बहुउद्धेशिय मंडळ, भारतीय बौद्ध महासभा, नंदुरबार फुले-आंबेडकर स्टडी सर्कल व समस्त बौद्ध समाज शहादा आदीसह विविध संस्था-संघटनांनी देखिल सहभाग घेतला होता.

दरम्यान, आषाढी पौर्णिमेपासून बौद्ध धम्मातील वर्षावास उत्सवास सुरुवात झाली आहे. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत बारा आठवडे, भन्ते कौंडिण्य शहादा शहरात धम्मदेसना तसेच बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथांचे सामुहिक वाचन करणार आहेत. उपक्रमात सर्व समाज बांधवांनी उत्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!