शहर हगणदारीमुक्त न झाल्यास अनुदान रोखणार

0

जळगाव | प्रतिनिधी :  शहर हगणदारीमुक्त न झाल्यास शासनाकडून मिळणारे विशेष अनुदान दिले जाणार नाही. असे आदेश शासनाने जारी केले आहे. त्यामुळे आयुक्त जीवन सोनवणे यांनी हगणदारीमुक्त करण्यासाठी सातत्य टिकविण्याची गरज असल्याचे पत्र सर्व नगरसेवकांना दिले आहे.

शासनाने दि.१५ मार्च २०१७ पर्यंत शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यानुसार मनपा प्रशासनाने शहरात सर्वेक्षण करुन ५८ ठिकाण शोधले. यातील ५७ ठिकाण हगणदारीमुक्त झाल्याचा दावा देखील प्रशासनाने केला आहे.

दरम्यान, शहर पूर्णपणे हगणदारीमुक्त न झाल्यास महानगरपालिकेला दिले जाणारे विशेष अनुदान दिले जाणार नाही. अशा इशारा वजा आदेश शासनाने जारी केले आहे. त्यानुसार आयुक्त जीवन सोनवणे यांनी मनपाच्या सर्व नगरसेवकांना आपआपले वार्ड हगणदारीमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे पत्र दिले आहे.

LEAVE A REPLY

*