शहर विकासासाठी मुख्यमंत्र्यांना घालणार साकडे – निमा

निमात झालेल्या चर्चेत विविध क्षेत्रांतील उद्योजकांनी मांडल्या भूमिका

0

सातपूर | दि.२८ प्रतिनिधी
शहराच्या औद्योगिकणणाला जास्त गतीमान करण्यासोबतच उद्योगांच्या विस्तारातून मिळणारा रोजगार व विकासाचा दृष्टीकोन लक्षात गेऊन निमाच्या पूढाकाराने आज निमा हाऊस येतष शहरातील नामवंत उद्योजकांच्या उपस्तितीत बैठक घेण्यात आली.

निमा हाऊस येते झालेल्या या बैठकीत महिंद्राचे उपाध्यक्ष हिरामण आहेर, बॉश लि. चे उपाध्यक्ष अविनाश चिंतावार,अशोका बिल्डकॉनचे चेअरमन अशोक कटारीया, इप्कॉसचे उपाध्यक्ष व निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक श्री जोशी, क्रेडाईचे माजी अध्यक्ष सुनिल भायभंग, निपमचे राष्ट्रीय खजिनदार ऍड. श्रीधर व्यवहारे, तसेच निमाचे माजी अध्यक्ष संजिव नारंग, मधुकर ब्राम्हणकर, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, सरचिटणिस उदय खरोटे,मनिष रावल, हर्षद ब्राम्हणकर, उदय रकिबे, गौरव धारकर, विशाखा वाईकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.

शहराच्या विकासाला गती देण्यासाठी परिसरात उद्यागांचे जाळे उभे राहणे गरजेचे असून, मान्यवराच्या मतांनूसार परिसरात अन्न प्रक्रिया उद्योग. माहीती व तंत्रमान (आयटी), इलेक्ट्रिकल्स व इलेक्ट्रॉनिक्स, पर्यटन या क्षेच्यिा क्षमता लक्षात गेऊन त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला मान्यवरांनी चर्चेत दिला. त्यामुळे येणार्‍या काळात परिसरात या क्षेतिल उद्योगांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा निर्णय सर्वानूमते मान्य करण्यात आला.

राज्य शासनाकडून विविद तालूका स्थरावरील उद्योग क्षेत्राला मोंया प्रमाणात ‘इन्सेटिव्ह’ योजना जाहीर केल्यास उद्योग वेगाने आकर्षीत होण्यास मदत होईल या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचे मन वळवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचनाही विचारात घेण्याचा ठरवण्यात आले.

‘मेक इन नाशिक’साठी निमाचा पूढाकार
मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेण्याचे वचन दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर उद्योगांना आकर्षित करण्यासाठी उद्योजकांच्या बैठकांद्वारे दिशा ठरवून मुख्यमंत्र्यांपूढे अहवाल सादर करणार आहोत. नाशिकच्या क्षमता व त्यादृष्टीने उद्योगांना प्रोत्साहन देण्याची मागणी करणार आहोत. कालची बैठक सकारात्मक झाली असून आणखी बैंठकांतून या मुद्यांवर सखोल चर्चा करण्यात येईल.
– हरीशंकर बॅनर्जी (अध्यक्ष निमा)

LEAVE A REPLY

*