शहरी भागाच्या विकासातून होते मतांचे राजकारण : काळे

0

धामोरी (वार्ताहर) – शेतकरी संघर्षमय जीवन जगत असून सध्याचे सरकार ग्रामीण भागाकडे लक्ष देत नाही. मतांच्या राजकारणासाठी शहरी भागाचाच विकास करणे याकडे अधिक लक्ष देत असल्याचा आरोप युवा नेते आशुतोष काळे यांनी केला.
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील धामोरी विविध कार्य. सेवा सोसायटीच्या इफको खतविक्री केंद्राचे उद्घाटन आशुतोष काळे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. काळे म्हणाले, इफको संस्थेच्या वतीने शेतकर्‍यांना अगदी कमी दराने खते व औषधे उपलब्ध होत आहे. तसेच शेतकर्‍यांना विमा सुरक्षाही उपलब्ध करून दिली आहे. मात्र पाणी प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष नाही. शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचे काम सरकारचे चालू आहे. शेत मालाचे बाजार भाव कमी असल्याने शेतकरी बँकेचे कर्ज भरू शकत नाही.
चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले, इफकोने औषधामध्ये बदल करून चांगल्या प्रकारची औषधांची निर्मिती केली, त्याचा फायदा शेतकर्‍यांना झाला आहे. यावेळी राजेंद्रबापू जाधव, इफाकोचे व्यवस्थापक देसाई, फर्टीलायझर्सचे अध्यक्ष प्रकाश कवडे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, उपसभापती अनिल कदम, संचालक ज्ञानदेव मांजरे, संचालक कैलास माळी, नारायण मांजरे, पंडित चांदगुडे, बोरसे, दिलीप पायमोडे, देवानाना गाडे, अनंत गाडे, सुदाम गाडे, अ‍ॅड. चिने, श्री. गवळी, संस्थेचे अध्यक्ष पुंडलीक माळी, भगवान माळी आदींसह शेतकरी व संस्थेचे सर्व संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधव खिलारी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. नारायण बारे यांनी केले तर आभार भगवान माळी यांनी मानले.

LEAVE A REPLY

*