शहरात दूषित पाणीपुरवठा

0
जळगाव  / शहरात पाच दिवसानंतर सुरळीत पाणीपुरवठा झाला. मात्र खोटेनगर येथील जलकुंभावरुन झालेला पाणीपुरवठा दुषित व पिवळसर रंगाचा झाल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.
वाघुर धरण व जलशुद्धीकरण केंद्राजवळ विजपुरवठा खंडीत झाल्यामुळे तब्बल 5 दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.
मनपा व महावितरण विभागाच्या पथकाने दुरुस्ती केल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला. शहरातील सर्व जलकुंभ भरण्यात आले असून नियोजित पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे पा.पु.अयिभंता डी.एस.खडके यांनी सांगितले.

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला असला तरी दुर्गंधीयुक्त व पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

मनपा प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी देखील व्यक्त होवू लागली आहे.

महापौरांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र
गेल्या पाच दिवसांपासून विद्युतपुरवठा खंडीत झाल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून 33 केव्हीची वीजवाहिनी उपलब्ध करुन द्यावी, अशा आशयाच्या मागणीचे पत्र महापौर नितीन लढ्ढा यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना दिले.

LEAVE A REPLY

*