शहरात तीन ठिकाणी घरफोड्या

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील सावेडीत भाग्योदय कॉलनी, अहमदनगर कॉलेज व डॉन बॉस्को रोड अशा तीन ठिकाणी चोर्या व घरफोड्या झाल्या आहेत. त्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला आहे. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हजुक दिनेश थोरात हे 2 डॉन बॉस्को रोड येथून जात असताना अज्ञात चोरांनी त्यांना अडवून त्यांना फायटरने मारहाण केली. त्यांच्या हातातील मोबाईल व रोख रक्कम असा सहा हजारांचा मुद्देमाल हिसकावून नेला आहे. तसेच अहमदनगर कॉलेजच्या रुम नंबर येथे प्रवेश करून टेबलावर ठेवलेला हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला आहे. याप्रकरणी कोतवालीत गुन्हा दाखल केला असून व्ही. आर. पठाण तपास करीत आहेत. तर सावेडी परिसरात भाग्योदय कॉलनी येथे रवींद्र वसंत धर्माधिकारी यांच्या घरी घरफडी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.9) रोजी सकाळी 12 वाजण्याच्या घडली. यात दोन लाख आठ हजारांचा मुद्देमाल चोरी गेला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*