शहरातील सहा जागा निश्चित

0

जळगाव / अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या पाठोपाठ भूमिगत गटारी व मलनिःसारण प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु आहे.

त्यासाठी शहरातील सहा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

अमृत अंतर्गत 249 कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया देखील पार पडली.

पाणीपुरवठा योजनेबरोबरच भूमिगत गटारी व मलनिःसारण योजना देखील प्रशासनाने प्रस्तावित केली. त्यानुसार 293 कोटीचा प्रस्ताव तयार करुन आयुक्त जीवन सोनवणे यांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या सचिवांच्या उपस्थितीत सादरीकरण केले.

त्यावेळी प्रस्तावामध्ये एक मलनिःसारण प्रक्रिया प्रकल्पाचा समावेश होता. परंतु नगरविकास सचिवांनी खर्चाची बचत करण्यासाठी शहराच्या चारही बाजूने मलनिःसारण प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वीत करण्याबाबत सुधारित प्रस्ताव देण्याची सूचना केली होती.

त्याअनुषंगाने आयुक्त जीवन सोनवणे यांनी बांधकाम विभाग आणि नगररचना विभागाला शहरातील जागा शोधून निश्चित करव्यात, असे सांगितले होते.

त्यानुसार मलनिःसारण प्रक्रिया प्रकल्पासाठी खेडीनाल्याजवळ, लेंडी नाला, हरिविठ्ठलनगर नाला, पिंप्राळा नाला, निमखेडी गावठाण आणि गिरणा पंपींग रोडवरील रेल्वे लाईनजवळ अशा सहा जागा निश्चित करण्यात आल्या असून सुधारीत प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

प्रशासनातर्फे करण्यात येणारा हा सुधारीत प्रस्ताव 250 कोटीचा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*