शहरातील वेगवेगळ्या भागातील तीन जण बेपत्ता

0
जळगाव  / शहरातील शाहुनगर, म्युनिसिपल कॉलनी, हरिविठ्ठल नगरमधील या भागातील तिघे जण बेपत्ता झाले असून याबाबत पोलिस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील शाहुनगरातील राहुल दिलीप वाघ वय 28 हा दि. 25 मे पासून घरात काहीही न सांगता निघून गेला आहे. त्यांने अंगात निळया रंगाची फुलपॅन्ट व बदामी हाफ शर्ट घातला आहे.

आई शारदाबाई वाघ यांच्या खबरीवरून शहर पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली असून तपास पोकॉ. राजेंद्र परदेशी करीत आहे.

हरिविठ्ठल नगरातील व्यंकटेशनग मधील 26 वर्षीय चंद्रकांत आत्माराम लोंढे दि.28 पासून सायबर कॅफेवर जावून येतो असे सांगून घराबाहेर गेला.

अजूनही तो घरी न परतल्याने त्यांची आई कुसुम लोंढे यांच्या खबरीवरुन रामानंद नगर पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

चंद्रकांत हा शरीराने मजबुत रंगाने गोरा असून त्यांने पांढर्‍या रंगाचा चेक्सचा शर्ट व काळी पॅन्ट परिधान केली आहे. यााबाबत महिती मिळाल्यास रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोहेकॉ काशिनाथ कोेळंबे यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

म्युनिसिपल कॉलनीत प्रमोद जगताप यांचा आतेभाऊ सुनिल नेरपगारे वय 32 रा. कजगाव हा त्यांच्याकडे दि.30 एप्रिल रोजी आला होता.

बाहेरून जावून येतो असे सांगून सुनिल वाल्मिक नेरपगारे हा घराबाहेर गेला. अद्याप तो घरी न आल्याने याबाबत रामानंद नगर पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

सुनिल हा शरीराने मजबुत, रंगाने सावळा, डोेक्यावर टक्कल असून याबाबत माहिती मिळाल्यास रामानंद नगर पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*