शशिकला यांचा कारागृहातील भ्रष्टाचार उघड करणा-या महिला अधिका-याची वाहतूक विभागात बदली

0

अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना कारागृहात व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचे उघड करणा-या महिला पोलीस अधिकारी डी रुपा यांची वाहतूक विभागात बदली करण्यात आली आहे.

डी रुपा यांच्यावर अधिका-यांना कोणतीही माहिती किंवा पुर्वकल्पना न देता प्रसारमध्यांमध्ये माहिती लीक केल्याचा आरोप करण्यात करण्यात आला होता.

कारागृहाच्या उपमहानिरीक्षक डी रुपा यांनी अधिकारी कारागृहात बेकायदेशीर गोष्टी करण्यास परवानगी देत असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. शशिकला यांना स्वयंपाकासाठी स्वतंत्र रुम देण्यात आली आहे.

त्यांनी यासंबंधी पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक आर के दत्ता तसंच कारागृह पोलीस महासंचालक सत्यनारायण राव यांना पत्र लिहिलं होतं. कर्नाटक सरकारलाही यासंबंधी अहवाल पाठवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

*