शक्तीचे खरे रुप म्हणजे स्त्री – नायब तहसीलदार योगीता ढोले

0

साकळी, ता. यावल | वार्ताहर :   पुरूष स्त्रीयांचे शत्रू असल्याचे चित्र तयार झालेले आहे. त्यामुळे महिलांच्या प्रगतीसाठ परिस्थिती अनुकूल नाही. परंतू आता परिस्थिती बदलली आहे. स्त्रीला तिच्या सर्वांगिण विकासासाठी जगाचे दरवाजे खुले आहे. ती आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे कोणत्याही क्षेत्रात प्रगतीची गगनभरारी घेवू शकते. एकूणच शक्तीचे खरे रूप स्त्रीया मध्ये पाहीले जाते. असे मत यावलच्या निवडणूक शाखेच्या नायब तहसीलदार योगिता ढोले यांनी व्यक्त केले.

क्रांती ज्योती बहुउद्देशिय संस्था व अखिल भारतीय माळी महासंघ यांच्या सहकायाने जागतीक महिलादिनानिमित्ताने व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथिनिमित्ताने कन्या रत्न प्राप्त माळी समाजातील १३ पालकांचा सावित्रीबाई फुले आदर्श  पालक पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. त्यावेळी  त्या बोलत होत्या.

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, महिला सबलीकरणासाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांचा लाभ घेवून महिलांना जगाच्या विकासाच्याप्रवाहात यावे. स्त्रीने स्त्रीची शत्रू न बनता परस्परांमध्ये  स्नेहभाव निर्माण करावा.

यावेळी व्यासपीठावर खान्देश माळी महासघांच्या महिला जिल्हाध्यक्षा विद्याताई महाजन, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिती पाटील, ग्राम पंचायत सदस्या सुनिता चौधरी, माळी महासंघाच्या सरचिटणीस शितल माळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना विद्याताई महाजन म्हणाल्या की, पुर्वीच्या काळात महिलांना घराबाहेर पाऊल टाकणे फार कठिण होते. पण आता स्थिती बदलली आहे. महिला स्व कर्तृत्वाने यशाचे शिखर गाठत असल्याचे सांगितले. यावेळी माळी महासंघाचे जळगाव शहराध्यक्ष नंदू महाजन, कार्याध्यक्ष कृष्णा माळी,जिल्हा सरचिटणीसआबा महाजन, किशोर माळी आदी उपस्थित होते.

महिला जिल्हाध्यक्षा संध्या माळी यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले. तर संतोष महाजन यांनी आभार मानले.  निवृत्त शिक्षक वामन माळी यांनी दोन मुलींंचे प्राथमिक शिक्षणाचा खर्च उचलण्याची घोषणा केली.

LEAVE A REPLY

*