व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलिंगमध्ये भारत अग्रस्थानी; दररोज 8.33 लाख तास व्हिडीओ कॉल

0

जगभरात दररोज 5.5 कोटी व्हिडिओ कॉल्स केले जातात.

जगात दररोज एकूण 34 कोटी मिनिटं व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल्सवर बोललं जातं. जगभरात व्हॉट्सअॅपचे 20 कोटी मासिक अॅक्टिव्ह यूझर्स आहेत.

भारतीय यूझर्समध्ये ‘व्हॉट्सअॅप’चं वेड इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. विशेष म्हणजे फक्त टेक्स्ट मेसेजच नाही, तर व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल्समध्येही भारत अग्रस्थानी आहे.

भारतीय यूझर्स व्हॉट्सअॅपवरुन दररोज 50 मिलियन म्हणजेच 5 कोटी मिनिटं व्हिडिओ कॉल करतात. म्हणजेच भारतीय दररोज सरासरी 8 लाख 33 हजार 333 तास वेळ व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलिंगवर घालवतात.

कोणतीही थर्ड पार्टी जाहिरात सुरु करण्याचा मानस नसल्याचं व्हॉट्सअॅपने स्पष्ट केलं आहे. व्हॉट्सअॅप कंपनी फेसबुकने विकत घेतली आहे.

फोटो स्टोरी, जीआयएफ इमेज यासारखी फीचर्स अलिकडच्या काळात लाँच करण्यात आली आहेत. त्यानंतर डिजीटल पेमेंटच्या दृष्टीने व्हॉट्सअॅपचे प्रयत्न सुरु आहेत.

LEAVE A REPLY

*