व्हॉट्सअॅप लग्नमध्ये प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्ववादी पुन्हा एकत्र दिसणार!

0

व्हॉट्सअॅप लग्न चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे.

प्रार्थना आणि वैभवची प्रमुख भूमिका असलेल्या व्हॉट्सअॅप लग्न या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

या पोस्टरमध्ये आपल्याला प्रार्थना आणि वैभव सेल्फी काढताना दिसत आहेत तर त्यांच्यासमोर एक टेबल आणि त्यावर दोन कप आहेत. त्यांच्या चित्रपटाचा हा पोस्टर पाहाता व्हॉट्सअॅप लग्न हा एक रोमँटिक चित्रपट असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

कॉफी आणि बरेच काही या चित्रपटानंतर कॉफी आणि बरेच काही या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस यावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे.

प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी यांनी कॉफी आणि बरंच काही आणि मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

LEAVE A REPLY

*