Type to search

आरोग्यदूत

व्हेरीकोस व्हेन्स कशामुळे होतात

Share

हृदयाकडून इतर भागांकडे शुद्ध रक्त घेऊन जाणार्‍या वाहिन्यांना धमणी म्हणतात आणि शरीराच्या इतर भागातून अशुद्ध रक्त हृदयाकडे शुद्धीकरणासाठी घेऊन जाणार्‍या रक्तवाहिन्यांना तशळप (नीला) असे संबोधले जाते. हातामध्ये आणि पायामधे व्हेन्सच्या दोन रचना असतात. र्डीशिीषळलळरश्र तशर्पेीी डूीींशा म्हणजे ज्या नीला आपल्याला त्वचेखाली दिसतात त्या, आणि ऊशशि तशर्पेीी डूीींशा म्हणजे धमनीच्या बाजूने जाणार्‍या नीला. ह्या दोन्ही रचना एकत्रितरित्या अशुद्ध रक्त वाहून नेतात, कारण ठिकठिकाणी त्या एकमेकांशी विशिष्ठ पद्धतीच्या झडपांद्वारे (तशर्पेीी तरर्श्रींशी) जोडल्या गेलेल्या असतात. ह्या झडपा अश्या पद्धतीने काम करतात कि र्डीशिीषळलळरश्र कडून ऊशशि तशर्पेीी डूीींशा कडेच फक्त रक्ताचा प्रवाह जातो, साधारणतः उलट्या दिशेने हा प्रवाह कधीच जात नाही.

जांघेच्या भागांमध्येही अश्या प्रकारची एक जोडणी असते, ज्यामध्ये र्डीशिीषळलळरश्र तशर्पेीी डूीींशा एकत्रित होऊन एक मोठी नीला (ॠीशरीं डरहिशर्पेीी तशळप) तयार होते आणि ती ऊशशि तशर्पेीी डूीींशा ला एका झडपेद्वारे जोडली गेलेली असते ( याला डरहिशपेषशोीरश्र र्गीपलींळेप असे संबोधले जाते). इथेही वर नमूद केल्याप्रमाणे एकदिशीय (णपळवळीशलींळेपरश्र) प्रवाह असतो. अश्याच पद्धतीची अजून एक जोडणी गुडघ्याच्या पाठीमागच्या भागात असते. (याला डरहिशपेिेश्रिळींशरश्र र्गीपलींळेप असे संबोधले जाते.)

कुठल्याही कारणांमुळे वर नमूद केल्याप्रमाणे एकदिशीय (णपळवळीशलींळेपरश्र) प्रवाह जर उलट्या दिशेने वाहू लागला, तर त्याचे रूपांतर व्हेरीकोस व्हेन्समध्ये होते.

1. दीर्घकाळ उभे राहण्याचा व्यवसाय असलेल्या व्यक्ती (जसे कंडक्टर, शिक्षक, मजूर), 2. गर्भवती महिला, 3. स्थूल प्रकृती असणार्‍या व्यक्ती 4. अनुवंशिकता, 5. वयोमानानुसार झडप निकामी होणे किंवा निलांची भिंत पातळ होणे.

या व्यक्तींमध्ये पायाकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणार्‍या (नीला/ तशळप) वाहिन्यांचा घेर विस्तृत होऊन (फुगून) त्या कालांतराने पिळवटू लागतात. याला व्हेरीकोस व्हेन्स असे म्हणतात. रक्तवाहिन्यांमधील सतत उच्च रक्तदाब आणि निकामी झालेल्या झडपा यामुळे हा प्रकार होतो.

ह्याची काय लक्षणे असतात?
1. सुरुवातीच्या दिवसांत संध्याकाळच्या वेळेस पाय दुखणे 2. घोट्याजवळचा भाग लाल / काळसर पडणे 3. पायाला खाजव येणे, त्यातून पाणी येणे 4. पोटरीच्या भागात गाठी जाणवणे ही लक्षणे दिसू लागतात.

योग्य वैद्यकीय सल्याअभावी कालांतराने पायाच्या घोट्याच्या भागात जखमा होऊन त्या काहीकेल्या सावळत नाहीत. फुगलेली रक्तवाहिनी फुटून रक्तस्त्राव होण्याचीही दाट शक्यता असते.

अशी लक्षणे असल्यास, प्लास्टिक सर्जनना दाखवून त्यांच्या सल्याने दोघे पायांच्या योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात. लवकर ही समस्या लक्षात आली तर विशिष्ठ प्रकारचे मोजे (उेािीशीीळेप डीेंलज्ञळपसी), पाय उशीवर वरती उचलून ठेवणे, शक्य झाल्यास कामाचे स्वरूप बदलणे या गोष्टी पाळल्यास बर्‍याच लोकांना आराम मिळतो. गरोदर महिलांमध्ये व्हेरीकोस व्हेन्सची समस्या असल्यास आणि अश्या व्यक्ती ज्यांच्यामध्ये ऑपरेशन करता येणे शक्य नाही, त्यांनाही हाच सल्ला दिला जातो. पण उशिरा लक्ष्यात आल्यानंतर किंवा समस्या चिंताजनक असल्यास खराब असलेल्या व्हेन्सचा भाग काढून टाकणे हाच एक उपाय आहे. त्यासाठी ओपन सर्जरी (झशीषेीरीेीं ङळसरींळेप / डीींळिळिपस / झहश्रशलशलीेाूं) हा रामबाण उपाय उरतो. निकामी झालेल्या झडपांचा भाग काढून टाकून र्डीशिीषळलळरश्र आणि वशशि तशर्पेीी डूीींशाी एकमेकांपासून वेगळ्या करणे जेणेकरून उच्च दाबाने र्डीशिीषळलळरश्र तशर्पेीी डूीींशा मध्ये रक्तप्रवाह येणे कायमचे बंद होते.

हे ऑपरेशन साधारणतः कमरेत भूल देऊन केले जाते. सोनोग्राफीच्या साहाय्याने निर्देशित केलेल्या जागांवर छोट्या चिरा घेऊन हे केले जाते आणि नंतर टाके घातले जातात. व्रण कालांतराने नाहीसे होतात. ऑपरेशन झाल्यानंतरही उेािीशीीळेप डीेंलज्ञळपसी, रात्री पाय उशीवर उचलून झोपणे, शक्य झाल्यास कामाचे स्वरूप बदलणे या गोष्टी पाळल्या तर रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. लेझरद्वारे पण हे केले जाऊ शकते. परंतु, त्यामध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा प्रश्न परत उद्भवण्याची संभावना खूप जास्त असते. कुठल्याही आयुर्वेदिक, क्षारसूत्र, किंवा जळू लावून व्हेरीकोस व्हेन्सचा उपचार होत नसतो, हे कटाक्षाने सांगावेसे वाटते.
डॉ. किरण नेरकर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!