व्हॉट्सअ‍ॅपसाठी मोजा पैसे!

0

नवी दिल्ली : फेसबुक आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनही पैसे कमावण्याच्या विचारात असल्याचे समोर आले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलचे वृत्त याला दुजोरा देणारे ठरले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने बिझनेस फीचर सुरु करणार आहे.

कंपन्यांना व्हॉट्सअ‍ॅप व्हेरिफाईड अकाऊंट देणार आहे.

ज्यामुळे कंपन्या ग्राहकांशी सहजपणे संवाद साधू शकतील.या फीचरची चाचणीही व्हॉट्सअ‍ॅपने भारतात सुरु केली आहे.

बिझनेस फीचर सुरु झाल्यानंतर भविष्यात कंपन्यांकडून या सेवेसाठी पैसे वसूल केले जाऊ शकतात, असं व्हॉट्सअ‍ॅपच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मॅड इडेमा यांनी वॉल स्ट्रीट जर्नलफला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. मात्र या मुलाखतीत त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या व्यावसायिक धोरणांबाबत अधिक माहिती दिली नाही.

LEAVE A REPLY

*