व्यापार्‍यांकडून दहाची नाणी घेण्यास नकार

0
कळंबू ता.शहादा / दहा रुपयांची नाणी चलनातून बाद झालेली नसतांना कळंबूसह परिसरात काही पानटपरी, किराणा दुकानदार, इतर लहान-मोठे व्यावसायिक ही नाणी घेण्यास नकार देत असल्याने ग्राहक व दुकानदारांमध्ये वाद होतांना दिसत आहे. यामुळे नागरीक व धंदेवाईकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.
दहा रुपयांची नाणी जशी नवीन चलनात आली तेव्हा लोक मोठ्या उत्साहाने व दिसायला सोन्यासारखी असल्याने असंख्य नागरीकांनी साठवणूक करून ठेवली होती.

परंतु दहाची नाणी चलनातून बाद झाल्याच्या अफवेने नाणी साठवणूक करणार्‍यांची चांगलीच धांदल उडाली. परंतु या अफवेने लहान-मोठे व्यावसायिकांनीही ही नाणी घेण्यास नकार देवून बंद झाल्याची अफवा पसरवली आहे.

म्हणून संबंधीतांनी दहा रुपयांची नाणी स्विकारण्यास नकार देणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 

LEAVE A REPLY

*