व्यक्ती स्वातंत्र्याचा टेंभा मिरविणे योग्य नाही!

0

मनुष्य आणि त्याचे जीवन दोघेही अतिशय विचित्र आहेत, गुंतागुंतीच आहे. एकीकडे मनुष्य सतत स्वातंत्र्याचा जयघोष करीत असतो.स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्यासाठी त्याला स्वतःचे स्वातंत्र्य हवं असतं. लग्नानंतर हे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे अशी अलीकडच्या युवकांची अपेक्षाच नव्हे तर मागणी असते. आजची युवती देखील याला अपवाद नसावी.

व्यक्तिस्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा सतत जप करणार्‍या व्यक्तीला सामाजिकता देखील तितकीच जोरदारपणे हवी असते. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे . अशीच मनुष्य पणाची एक व्याख्या देखील करता येईल. अगदी प्राथमिक अवस्थेत आल्यापासून माणूस टोळ्यांनी राहत आला आहे.कारण संकटांचा सामना करून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याला समूहाने एकत्र रहाण भाग पडले.

यातूनच माणसाची जगण्याची पद्धत तयार होत गेली. राजकारण, सरकार, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, सहकार, त्यांचे प्रशासन अशा अनेक संस्था गरजेनुसार बनत गेल्या.कायदे बनले व त्यांच्या जीवनाला आकार आला. संरक्षण मिळालं, पुढे विवाह संस्थेचा उदय झाला. शेजारी व शेजारधर्म, मदत, सहकार्य या संकल्पना व अनेक सामाजिक संघटना देखील सामाजिक तेच्या भावनेतून उदयास आल्या.

हे सगळं मिळालं तरी माणसाचं समाधान झालेलं नाही. जेव्हा जे त्याच्यापाशी होतं ते त्याला नको असतं आणि जवळ नसतं ते त्याला हव असतं. याच विचित्र स्वभावामुळे कधी व्यक्तिगत स्वातंत्र्य हव असतं तर कधी ते मिळालं की त्याला एकटेपणाची जाणीव टोचू लागते आणि मग त्याला सामाजिक जीवनाची तहान लागते.या दोन्हीतून एकाची निवड करून त्याला जगता येणे अशक्य आहे. या दोन्ही जीवनाचा लाभ त्याला एकत्र घ्यावा लागतो. आणि दोन्हींचे नुकसानही त्याला एकत्रच सहन करावे लागतात.

हेच तर माणसाच्या जीवनातली गंमत आहे. तो एकाच वेळी पती-पत्नी, बेटा बेटी, आई बाप, ही नाती व्यक्तिगत पातळीवर जगत असतो, आणि त्याच वेळी सर्व नात्या मध्ये कुणीही एक नाराज होणार नाही याची काळजी घेत असतो. त्याच वेळी तो देशाचा नागरिक व समाजाचा सदस्य म्हणूनही जीवन जगत असतो. जेव्हा तो अडचणीत येतो तेव्हा त्याला सामाजिक जीवन, सामाजिक संरक्षण हव असतं. पण नोकरी, जीवनसाथी निवडताना त्याला व्यक्तिगत स्वातंत्र्य हवं असतं. त्याच्या जीवनातल्या एखाद्या बर्‍या किंवा चांगल्या गोष्टीची उघड चर्चा होऊ लागली तर तो प्रश्नकर्त्याला पर्यायानं समाजाला ठणकावून बजावतो ती माझी खाजगी गोष्ट आहे इतरांचा तिच्याशी काही एक संबंध नाही.

निवडणुकीसाठी तो मतदान करतो तेव्हा तो देशाचा नागरिक आणि समाजाचा सदस्य असतो. मात्र, मतपेटीत आपलं मत टाकताना तो स्वतंत्र मनुष्यप्राणी असतो. म्हणूनच त्याचं मत गुप्त राखले जाते. मात्र या मताचा परिणाम त्याला सामाजिक, राष्ट्रीय पातळीवर अनुभवायला मिळणार असतो. जय दुहेरी पण त्याच्या जीवनात आवश्यकच आहे. नुसतं आवश्यकच नाही नाही तर पूरक सुद्धा आहे. त्याबद्दल माणसानं हवा तर तक्रार करावी पण शेवटी हे दुहेरी जगण त्याला फायदेशीर आहे. हे फक्त मनापासून समजून घ्याव.विचार, अभिव्यक्ती, बुद्धी या माणसाला मिळालेल्या दुर्मिळ देणग्या आहे. त्यांच्या बळावर तर तो सतत व्यक्तिस्वातंत्र्याची टिमकी वाजवत असतो. मात्र इतर प्राण्यांच्या व निसर्गाच्या तुलनेत त्याची शारीरिक शक्ती खूपच कमी आहे. त्या शक्तीचा उपयोग करून घेण्यासाठी व त्या प्रबळ होतील तेव्हा त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याला समाज, प्रशासकीय यंत्रणा, सरकार या सारख्या संघटना यांची मदत घ्यावी लागणार आहे.

कधी व्यक्ती स्वातंत्र्याचा झेंडा मिरवायचा आणि सामाजिक जबाबदारी, सामाजिक जाणीव, सामाजिक भान यांची तरफदारी करायची हे तंत्र त्याला खरच छान जमलेला आहे. परिस्थितीवर मात करता आली नाही तर तिच्याशी जुळवून घ्यायचं हे मनुष्याला चांगलं कळतं. कमी शारीरिक शक्ती मुळे त्याला परावलंबनही खूप करावे लागत. त्या बाबतीत मुके प्राणीसुद्धा व्यक्तीला भारी ठरतात.

माणसाला जेवढी त्यांची मदत लागते तेवढी सोडा; त्यांना माणसाची अजिबातच गरज भासत नाही. सामाजिक संघटीत शक्तीच्या जोरावरच माणूस पशू प्राण्यांचा शोषण करून त्यांचा उपयोग करून घेत आहे. मग कशाला सारखी व्यक्तिस्वातंत्र्य श्रेष्ठ ही टिमकी वाजवायची? वाजवायची असेल हिंमत तर मानवाने रानावनात एकटे राहून दाखवाव?
मो. 9421523840
– ललितकुमार नीळकंठ फिरके

LEAVE A REPLY

*