व्यंकय्या नायडूंचा मंत्रिपदाचा राजीनामा; स्मृती इराणी यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी

0

नगरविकास मंत्रालय केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे तर माहिती व प्रसारण मंत्रालय हे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे सोपवण्यात आले

एनडीए उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

व्यंकय्या नायडू हे नगरविकास मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे कामकाज पाहत होते. त्यांच्याकडील मंत्रालयाचा पदभार नरेंद्र तोमर आणि स्मृती इराणी यांच्याकडे देण्यात आला आहे.

व्यंकय्या नायडू आज आपला उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

एनडीएकडून सोमवारी उपराष्ट्रपतिपदासाठी नायडू यांच्या नावाची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घोषणा केली. त्यांची लढत यूपीए उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांच्याशी होणार आहे.

नायडू यांच्याकडील नगरविकास मंत्रालय केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

तर माहिती व प्रसारण मंत्रालय हे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*